12:39pm | Oct 09, 2020 |
पटना : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते 74 वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना प्रकट केली आहे. बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.
सन 1946 मध्ये बिहारच्या खगडिया येथे जन्मलेल्या रामविलास पासवान यांनी एका छोट्या भागातून येऊन दिल्लीच्या सत्तेपर्यंतचा संघर्ष आपल्या एकट्याच्या जीवावर केला होता. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची बिहार आणि देशाच्या राजकारणात छाप राहिली. दरम्यान, दोन वेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |