11:05pm | Jul 05, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची दहशत पुन्हा गडद होऊ लागली असून काल रात्रीपासून कोरोनाचे तब्बल 90 रूग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यातील 7 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1336 वर गेली असून त्यापैकी बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 791 आहे. त्यातच सातार्यातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या एका पत्रकारालाही कोरोनाची बाधा झाली असून त्याच्या संपर्कातील अन्य पत्रकार भीतीच्या छायेखाली आले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नजीकच्या काळातील पत्रकार परिषदा थांबवण्याचा निर्णय जिल्हा पत्रकार संघाने घेतला आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सातारा तालुक्यातील चोरगेवाडी येथील 11 व पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 6 बाधित निघाल्याने ही गावे हॉटस्पॉट झाली आहेत. माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25, 36, 47 वर्षीय पुरुष व 50, 40, 23 वर्षीय महिला, काळवूैटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, वाझोली येथील 32 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 50 वर्षीय पुरुष, खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्वै येथील 40 वर्षीय महिला, मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30, 16, 48, 36, 24, 20, 40 वर्षीय पुरुष व 23, 45, 75, 35 वर्षीय महिला, निनाम पाडळी येथील 1, वाई तालुक्यातील अभेपुरी येथील 45 वर्षीय पुरुष, उडतरे येथील 1, पसरणी येथील 1, वाई येथील 2, बदेवाडी येथील 1, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, वैैलास अपार्टमेंट (सैदापूर) येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष, कार्वेनाका येथील 25 वर्षीय महिला, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील शेणवडी येथील 26 वर्षीय पुरुष यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्या सातारा येथील एका पत्रकाराला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने सातारच्या मीडियात खळबळ माजली आहे. संबंधित पत्रकाराच्या संपर्कात आलेल्या पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पत्रकार मित्रांनी भयभीत न होता काळजी घ्यावी, त्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, त्यांच्या तपासणी व उपचारासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे असे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बरे झालेल्या 7 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष व राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील सवली येथील 27 वर्षीय पुरुष, शिंदे वस्ती (लोणंद) येथील 37 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील वाई शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |