रायपुर : छत्तीसगडच्या सुकमा या नक्षलग्रस्त भागात गस्तीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर शनिवारी नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे. २०२० मधील हा सर्वाधिक मोठा हल्ला मानला जात आहे. शनिवारी दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरुन परतत होते. या हल्ल्यानंतर १७ जवान बेपत्ता झाले तर १४ जखमी झाले होते. यापैकी जखमींना शनिवारी रात्री उशीरा या जखमी जावानांना एअरलिफ्ट करुन रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे ३०० डीएआरजी आणि एसटीएफचे जवान या भागात एका कामगिरीवर निघाले होते. ताज्या माहितीनुसार, सर्व बेपत्ता जवान शहीद झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांना घेरुन हल्ला केला. तब्बल तीन तास ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी इथून पळून गेले. यानंतर वेगवेगळ्या तुकड्यांच्या मार्फत हे जवान आपल्या कॅम्पकडे परतत होते. मात्र, रविवारी सकाळी १७ जवानांचा थांगपत्ता नसल्याचे दिसून आले. घनदाट जंगल आणि वातावरणाची स्थिती खराब असल्याने या जवानांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. ड्रोनच्या मदतीने जवानांचा शोध घेतला जात होता.
सुकमातील चकमकीनंतर जवानांच्या बेपत्ता होण्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. शनिवारी रात्री डीजीपी डीएम एवस्थी यांनी मुख्यंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.
सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांच्या टीमला नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्या शोधासाठी हे जवान निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिसांनी ४ ते ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. असंही सांगितलं जात आहे की, हे नक्षलावादी बुलेट प्रुफ जॅकेट घालून आले होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |