पावसाळ्यामुळे हवामान थंड असले तरी राजकीय आघाडीवर अधून मधून पारा वर चढलेला दिसतो. याचा प्रत्यय नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आला. हरित लवादाच्या दणक्यामुळे महाबळेश्वर परिसरात वनक्षेत्रात बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईच्या नोटीसा निघाल्या. या प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत या नेत्यांच्या बैठका झाल्या. त्यादरम्यान खासदार उदयनराजे भोसले आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या खास स्टाईलने त्यांना 'जादु की झप्पी' दिल्यामुळे जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरला. संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या जादुच्या झप्पीनंतर आता हीच झप्पी लोकांच्या स्मरणात राहील अशी टिप्पणी खासदार उदयनराजे यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी एकच खसखस पिकली.
खासदार उदयनराजे यांच्या या झप्पीचा अन्वयार्थ काय असा प्रश्न यानिमित्ताने सर्वांना पडला असल्यास त्यात नवल काय? लोकसभेची निवडणूक वर्षभरावर आली आहे. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे याही वेळी उदयनराजे यांना स्वकियांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात भव्य सोहळा घडवून आणण्यात आला. विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांना उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना बोलावलेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रण सर्वांच्या भुवया उंचावणारे होते. यातून उदयनराजे यांनी भाजपला चुचकारण्याचे धोरण ठेवल्याचे दिसते. एका बाजुला राष्ट्रवादीत आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून देताना आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सूतोवाचही त्यांनी यातून केले आहे.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची नावे पत्रिकेवर असताना मुख्य कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरवली. त्यातून या आमदारांनी काय द्यायचा तो संदेश दिला. मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्याच्या कृतीला एकप्रकारे हे पक्षाकडून प्रत्युत्तर होते. एकिकडे आमदारांनी आपला पवित्रा दाखवून दिला असला तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आजअखेर याविषयी मुत्सद्दीपणे आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे सातारच्या उमेदवारीबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.
वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतरही उदयनराजे यांच्या समर्थकांनी सातारा गौरव पुरस्कार वितरणाचा दुसरा भव्य कार्यक्रम आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले. त्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. मात्र ते येऊ शकले नाहीत. त्यांनी दिलेला व्हीडीओ संदेश यावेळी दाखवण्यात आला. तथापि, सरकारमधील दोन मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांनी कार्यक्रमाला येऊन उदयनराजे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. याद्वारे राष्ट्रवादीला डिवचण्याची संधी त्यांनी साधली. या पाश्र्वभूमीवर सातारचे लोकसभा निवडणुकीचे वातावरण व राजकारण आकार घेते आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होती. सातारची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्यापुढे पेच होता. पण काहीही झाले तरी राष्ट्रवादीची उमेदवारी आपणालाच मिळेल असे वातावरण तयार करण्यात त्यांना यश आले. ग्लॅमर, संघटन व त्याला मिळालेली पक्षाची साथ या संमिश्र ताकदीवर त्यांनी त्या निवडणुकीत २ लाख ९८ हजार मताधिक्क्याने विजय मिळवला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण तापवले गेले. मात्र शिवसेना - भाजप युतीच्या जागावाटपात सातारची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली गेली. ही बाब उदयनराजे यांच्या चांगलीच पथ्यावर पडली. समोर कोणीही तुल्यबळ उमेदवार राहिला नाही. या वातावरणावर स्वार होत त्यांनी आधीपेक्षा जास्त म्हणजे ३ लाख ६६ हजाराचे मताधिक्क्य घेऊन विजय साजरा केला. मोदी लाटेचे वारेही सातारकडे फिरकले नाही हे त्यातून सिध्द झाले. या विजयात उदयनराजे यांच्या व्यक्तिगत करिष्म्याचा भाग मोठा होता हे नाकारून चालणार नाही. पण २०१९ ची निवडणूक उदयनराजे यांच्यासाठी वाटते तितकी साधीसोपी असणार नाही. मोदी लाट साताऱ्यात २०१४ ला जाणवली नव्हतीच. आता अन्य ठिकाणीसुध्दा ती ओसरली आहे. उदयनराजे कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढले तरी विरोधात तगडा उमेदवार असू शकतो. शिवसेनेची सातारा जिल्ह्यात हुकमी व्होट बँक आहे. शिवसेनेने सातारचा गड यापूर्वी जिंकलेलाही आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना येथे जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरू शकते.
परवाची खासदार उदयनराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिलेली 'जादू की झप्पी' या सर्व दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. ती उदयनराजे यांच्या स्वभावाला अनुरूप सहज कृती वाटत असली तरी ती त्यांची साखरपेरणी आहे. एकप्रकारचे धक्कातंत्र आहे. तुम्ही माझे आहात आणि मीही तुमचाच आहे असे त्यांना यातून सूचित करायचे असावे. अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे. अनेक नाट्यमय घटना घडामोडी अजून घडू शकतात. त्यातून काय साध्य होईल काय नाही ते आगामी काळात पहायचे.
आता २०१९ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कशी समीकरणे आकारास येणार? काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही होणार? आघाडी झाल्यास जागा कोणाच्या वाट्याला येणार? राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार? खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचेच उमेदवार असणार की काही उलथापालथ होऊन भाकरी फिरवली जाणार? स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना, भाजपचे उमेदवार कोण असणार या सर्वच बाबतीत अद्याप सस्पेन्स आहे. तो आणखी काही काळ तसाच राहणार आहे.
- गजानन चेणगे
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |