कण्हेर : सैदापुर ता.सातारा येथील यश ढाब्या शेजारी असलेल्या किराणामाल व ग्लास सेंटर असलेली दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. यामध्ये मशीन, हॅमर, ग्रील व गल्ल्यातील पैसे असा एकूण पाऊण लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.या आठवड्यात दुसऱ्यांदा याच परिसरात दुकाने फोडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या आठवड्यापासून दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. सातारा-मेढा रस्त्यालगत असणाऱ्या साई ग्लास सेंटर हे दुकान आठवड्यात दुसऱ्यांदा फोडण्यात आले आहे. शिवाय त्यालगत असणारे किराणा मालाचे दुकानही फोडले आहे. या चोरीमध्ये लोखंडी पारा व चेहऱ्यावरील मास्क यांचा चोरांनी वापर केल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी २ लोखंडी पारा व मास्क चोरीच्या ठिकाणी सोडून रात्रीच चोरटे पसार झाले आहेत.
साई ग्लास सेंटर या दुकानाचे शटर पार यांनी उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसला गेल्याने, मागील दरवाजा तोडून चोरटे दुकानात घुसले आहेत. या दुकानातील ड्रिल मशीन, हॅमर, प्लाय कटर व सुमारे १०० किलो चे स्टील, असा एकूण सुमारे पाऊण लाख रुपयेचा एवज लंपास केला आहे. तसेच शेजारील असलेल्या पद्मावती किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून दुकानाच्या गल्यातील पाच हजार रुपये लंपास केले आहेत. गत आठवड्यात हेच साई क्लास सेंटर फोडून मशीन व साहित्य मिळून सुमारे तीस हजार रुपयेचा एवज चोरून नेला आहे.
याबाबत संबंधित मालकाने तालुका पोलीस ठाण्यात कळविले असता, तपासासाठी सदर ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आहे. तालुका पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण गीते व पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव हे अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच शेजारी असलेल्या मेरी एंजल्स स्कूलमध्ये सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |