01:53am | Feb 25, 2020 |
सातारा : राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड करुन फलटणमधील एका युवकाने भारतीय सेना, निमलष्करी दल तसेच नौदलामध्ये भरती करण्याचे अमिष दाखवून सातारा जिल्ह्यासह राज्यातील शेकडो युवकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून त्यांना बोगस नियुक्तीपत्रेही दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित युवकाविरोधात फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज गेल्याने फलटण पोलिसांबरोबर आर्थिक तडजोडी करुन हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपतच्या जाळ्यात अडकवून कोट्यवधींचा सैन्य भरती घोटाळा दडपला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फलटण तालुका हा बोगस सैन्य भरतीचा 'हब' झाले असून गेल्या काही वर्षापासून उमद्या तरुणांना सैन्य भरतीचे अमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या रॅकेटची व्याप्ती आहे. गेल्या महिन्यात भाडळी, ता. फलटण येथील सचिन डांगे या युवकाला बोगस सैन्य भरतीप्रकरणी अटक झाली होती. सध्या सचिन डांगे हा न्यायालयीन कोठडीत आहे. परंतू सचिन डांगे हा हिमनगाचे टोक आहे. यातील खरा सूत्रधार मात्र अद्याप मोकाट असून कोट्यवधींचा केलेला सैन्य भरती घोटाळा दडपण्याची तयारी सुरु आहे. गेल्या आठवड्यात दि. 18 रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्यावर सातार्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला. या ट्रॅपमध्ये चार लाखाची रोकड स्विकारताना दळवी यांना अटक झाली. सकाळी तक्रार, संध्याकाळी ट्रॅप यामुळे लाचलुचपतची ही कारवाई संशयाच्या भोवर्यात आलेली आहे. वास्तविक पोलीस उपनिरीक्षक दळवी हे सचिन डांगे याने केलेल्या सैन्य भरती घोटाळ्याचा तपास करीत होते. यावेळी तपासादरम्यान, भाडळी, ता. फलटण येथील डांगे आडनावाच्या दुसर्या एका युवकाने अशाच पद्धतीने शेकडो मुलांकडून लाखो रुपये घेवून भारतीय सैन्य दल व नौदलाची अनेक बोगस नियुक्तीपत्रे देवून युवकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात त्या युवकाविरोधात फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारीअर्ज आले होते. मात्र फलटणमधील एका राजकीय पुढार्याचा वरदहस्त असल्यामुळे त्या युवकाने पोलिसांबरोबर अर्थपूर्ण तडजोडी करुन हे तक्रारी अर्ज बाहेरच्या बाहेर निकाली काढले होते. अनेक पोलीस अधिकार्यांना ‘त्या’ युवकाने महागडे फोन गिफ्ट दिले होते. एकेकाळी दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी मित्रांकडे हात पसरणारा तो युवक इम्पोर्टेड कार फिरवू लागल्यामुळे तो युवक नक्की करतो तरी काय, याबाबतची उत्सुकता भाडळी गावातील ग्रामस्थांसह फलटणमधील त्याच्या मित्रांना पडली होती. उंची राहणीमान, हातात लाखोंचे मोबाईल, गळ्यात भली मोठी सोन्याची चेन, मुंबई-पुणे- लोणावळ्यात राबता असल्यामुळे हा डांगे नक्की करतो तरी काय? याबाबत भाडळीसह फलटण तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा घडत होत्या. मात्र, कोणतीही गोष्ट जास्त काळ लपून राहत नाही. ज्या मुलांना त्या डांगेने नियुक्तीपत्रे दिली होती, ती पत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या युवकांनी पोलीस ठाण्यांत तक्रारीअर्ज केले. तक्रारीअर्ज दाखल झाल्याचे समजताच त्या डांगेने पैसे परत करण्याचे आश्वासन देवून अनेक युवकांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे. मात्र एखादा युवक ऐकत नसेल तर त्याचे पैसे त्याला परत करुन त्याच्याकडून नोटरी करुन घेतली जात असे. तसेच त्याला दिलेले बोगस नियुक्तीपत्रही त्याच्याकडून ताब्यात घेतले जात असे. त्यामुळे भलती झंझट नको म्हणून ते युवकही सर सलामत तो पगडी पचास असे म्हणत ते युवक आपली सुटका करुन घेत असत. मात्र, सचिन डांगेवर बोगस सैन्य भरती प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो डांगे हादरला होता. त्यामुळे अवैध वाळू तस्करी करणार्या आपल्या मामाचा उपयोग करुन घेत त्याने सचिन डांगेप्रमाणे आपलाही बकरा होवू नये म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्याकडे फिल्डिंग लावली. माझ्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करु नका, तुमचे जे काही असेल ते मी बघतो म्हणत दळवींना दाणा टाकण्यात आला. इकडे लाचलुचपतकडे दळवींच्या विरोधात तक्रार करुन त्याने फास तयार केला. सकाळी तक्रार आणि संध्याकाळी ट्रॅप, या फाश्यात दळवी सहज अडकले. जिरवाजिरवीत शातीर असलेल्या त्या डांगेने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. दळवीवर झालेल्या ट्रॅपनंतर त्या डांगेविरोधात फलटणमधील संपूर्ण पोलीस बॅकफूटवर गेले आहेत. लाचलुचपतच्या माध्यमातून त्या डांगेने फलटण पोलिसांवर दहशत निर्माण केल्यामुळे भाडळीच्या डांगेच्या नादाला नको रे बाबा, असे पोलीसच म्हणू लागले आहेत. मात्र बोगस सैन्य व नौदलात भरतीचे अमिष दाखवून व खोटी नियुक्ती पत्रे तयार करुन त्या डांगेने राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा खेळखंडोबा केलेला आहे. त्यामुळे त्याचे भारतात बंदी असलेल्या कोणत्यातरी दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत काय ?, याची तपासणी करणे गरजेचे असल्याने फलटणमधील बाळासाहेब शिंदे या सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्याकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार करुन त्या डांगेच्या मुसक्या आवळाव्यात, अशी विनंती केलेली आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या बोगस सैन्य भरती रॅकेटचा तपास केला जाईल. मात्र त्या अगोदर सातारा पोलिसांनीही त्या डांगेच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही फलटण तालुक्यातून होत आहे.
सातारा एसीबी व त्या डांगेचे आर्थिक लागेबांधे?
बोगस सैन्य भरती प्रकरणी भाडळी, ता. फलटण येथील सचिन डांगे या युवकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाडळीतीलच त्या डांगेचे धाबे दणाणले होते. परंतू सातारा पोलिसांना चेकमेट देण्यासाठी त्या डांगेने फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावरच एसीबीचा ट्रॅप लावून माझ्याशी पंगा, चौराहे पे नंगा अशी भूमिका घेत फलटण पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. मात्र सकाळी तक्रार व संध्याकाळी ट्रॅप (हाणून-मारुन) मुळे सेटलमेंटमध्ये माहीर असलेल्या त्या डांगेने सातारा एसीबीबरोबर आर्थिक तडजोडी करुन दळवींवर तो ट्रॅप लावल्याची चर्चा फलटण तालुक्यात आहे.
नियुक्तीपत्रांवर फलटणमधील रुग्णालयाचा शिक्का
भारतीय नौदलाच्या त्या नियुक्तीपत्रावर डांगेने चक्क फलटणमधील अश्विनी मेडिकल या रुग्णालयाचा शिक्का तसेच लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी चे कमांडर सतीशकुमार यांची सही व शिक्क्याचाही वापर करण्यात आला आहे. दरम्यान, हे शिक्के संबंधितांनी कोठून आणले वा बनवले, याचा शोधही तपासपथकाला घ्यावा लागणार आहे. डांगेने फलटणमधील कोणत्या रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर केला आहे? तो बनावट आहे की त्या रुग्णालयातील डॉक्टरचाही या बोगस सैन्य भरतीत हात आहे, याचाही शोध घ्यावा लागणार आहे.
कर नाही त्याला डर कशाची ?
फलटण येथील बोगस सैन्यभरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाडळी येथील त्या डांगेची तंतरली होती, सचिन डांगे प्रमाणे आपलीही चौकशी होऊन आपल्यावर गुन्हा दाखल होणार, या भीतीपोटी त्या डांगेने आपल्या मामाला पीएसआय दळवी यांच्याकडे पाठवून दिले होते. तसेच त्याच्या मामानेच पीएसआय दळवीला पैशाची ऑफर केली होती. जर त्या डांगेचा बोगस सैन्य भरती प्रकरणी काहीच संबंध नव्हता तर, त्याने गुन्हा दाखल करू नये यासाठी त्याच्या मामाला पीएसआय दळवीकडे का पाठवले होते ? तसेच अँटी करप्शनचा ट्रॅप लावण्यासाठी सुमारे चार लाखाची रक्कम कोठून आणली ? त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले ? असे प्रश्न निर्माण होतात. एकूणच त्या डांगेच्या या भानगडींमुळे या प्रकरणात ट्विस्ट वाढला आहे. कर नाहीतर डर कशाची ? याप्रमाणे त्या डांगेचा या प्रकरणात काहीच संबंध नव्हता तर त्याने एवढा उपद्व्याप कशासाठी केला असाही प्रश्न निर्माण होत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |