09:08pm | Mar 28, 2024 |
सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून साताऱ्यात ते लोकसभेचा निवडणूक उमेदवार निवडण्यासाठी निवडक दीडशे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. मुरब्बी पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. महाविकास आघाडीच्या गोटामध्ये खदखद कायम असताना राष्ट्रवादीतही संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध झाला आहे. ही खदखद पवार कशी मिटवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
सातारा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांचा संवाद मेळावा रंगणार आहे. पवारांचे सहकारी श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व सरचिटणीस राजकुमार पाटील यांची मेळाव्याला उपस्थिती राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचे तिढे नको इतके ताणले गेले आहेत. साताऱ्यातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे. तेच संभाव्य उमेदवार धरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची आखणी सुरू झाली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी आणि इलेक्शन मेरिटचा शोध, अशा दोन घटकांवर शरद पवार यांचे काम सुरू आहे. त्यामुळे शरद पवार नक्की काय भूमिका मांडणार, हे महत्त्वाचे आहे.
शरद पवार गटाच्या निवडक कार्यकर्त्यांनी पुणे मोदीबाग येथे पवारांची भेट घेऊन आपणच साताऱ्याचा बालेकिल्ला लढवावा, अशी गळ घातली होती. मात्र पवारांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे यापूर्वीच जाहीर केलेले आहे मात्र राजकारणामध्ये काहीही घडू शकते आणि पवारांनी मनात आणले तर पुन्हा एकदा पवार रिंगणात येणार का, या प्रश्नांनी सुद्धा उचल खाल्ली आहे. त्यामुळे पवार साताऱ्यात काय भूमिका मांडणार, याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या महायुतीच्या सातारा उमेदवारी संदर्भात अजूनही शिक्कामोर्तब नाही त्याचबरोबर माढा मतदारसंघांमध्ये भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी त्याला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे माढ्यातून धैर्यशील मोहिते हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या निमित्ताने शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा राजकीय रणनीतीचा काट्याचा सामना रंगलेला आहे.
शरद पवारांना साताऱ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या पवारांच्या पावसातील सभेने महाराष्ट्रातील सत्तेचे गणित बदलवले होते. त्याची मोठी किंमत भारतीय जनता पार्टीला मोजावी लागली. 105 आमदारांची संख्याबळ असूनही पहिले अडीच वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागले होते. पवारांची ही चाणक्य रणनीती बघूनच महायुतीने सुद्धा तगडी लढत देण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. साताऱ्यात तितक्याच ताकतीचा, तोलामोलाचा उमेदवार देण्याकरता पवार नक्की कोणते राजकीय डावपेच टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |