कराड : कालेटेक ता. कराड येथुन चोरीस गेलेल्या स्टीलचा 3 तासात छडा लावून कराड ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने आरोपीला वाहनांसह अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना मिटींगमध्ये सुचना व मार्गदर्शन केले होते.
दिनांक 2 मार्च रोजी तक्रारदार विकास जगन्नाथ पाटील वय 50 वर्ष रा. कासेगांव ता. वाळवा जि. सांगली यांनी तक्रार दिली होती की, दिनांक 1 मार्च रोजीचे रात्री 10 ते दिनांक 2 रोजीचे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कालेटेक ता. कराड येथील डी.पो. जैन कंपनीचे गेटजवळ उघड्यावरील 90 हजार रूपये किंमतीचे दिड टन वजनाचे स्टिल अज्ञात आरोपीने चोरुन नेले आहे, तक्रारी वरुन कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे सुचनेनुसार दि. 2 मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, यांना मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी पाचवड फाटा ता. कराड येथे सापळा लावला. त्यामध्ये गुन्हयातील संशयित आरोपी सुखदेव सर्जेराव मोरे मुळ रा. भवानीनगर ता. बाळवा जि.सांगली सध्या रा. कालेटेक ता. कराड हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम. एच. 50. एन. 5070 यामध्ये नमूद गुन्हयातील चोरीस गेलेला माल विक्री करणे करिता घेवून जात असताना त्यास तेथेच पकडुन सदर गुन्हयातील वापरलेले वाहन व मालासह एकुण 3 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी याचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांनी केली असुन पुढील तपास हवालदार उत्तम कोळी करत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |