09:22pm | Mar 26, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात अजूनही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने आपला दावा सोडलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे व येथे पक्षाचा उमेदवार दिला जावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी पुणे येथे आयोजित बैठकीत करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुमारे दोन तास सर्वांच्या भावना जाणून घेतल्या. तत्पूर्वी पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांची एकत्रितरित्या बैठक झाली. या बैठकीनंतर दादांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार मकरंद पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष अमित कदम, महिला अध्यक्षा सीमा जाधव, स्मिता देशमुख, श्रीनिवास शिंदे, शिवाजीराव महाडिक, सचिन बेलागडे, सागर भोगावकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा बालेकिल्ला आपल्याच ताब्यात राहावा आणि ही जागा सुद्धा राष्ट्रवादीलाच मिळावी, अशी आग्रही मांडणी केली.
या संदर्भात बोलताना अजित दादा म्हणाले, महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठका झालेल्या आहेत. तिन्ही घटक पक्षांनी आपापली बलस्थाने ओळखून त्या-त्या पद्धतीने जागा लढवण्याचे धोरण निश्चित केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात पत्रकारांनी अजितदादा यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अरे बाबा जरा दम काढ. तिन्ही घटक पक्षांनी ध्येयधोरण निश्चित केलेले असताना फिरून फिरून पत्रकार मला सातारा लोकसभेच्या मतदारसंघाविषयी विचारतात याची मला गंमत वाटते. येथे 28 मार्च रोजी घटक पक्षाचे तिन्ही नेते पत्रकार परिषदेद्वारे संपूर्ण जागांची माहिती देणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा उमेदवार कोण आहे, याची माहिती 28 मार्चला आपल्याला कळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |

केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |