खंडाळा : धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात वाहून चाललेल्या मुलाला वाचविण्यासाठी प्रवाहात उडी मारलेल्या अजनुज येथील पित्याचा मृतदेह तब्बल २० तासांनंतर हाती लागला आहे. या घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम पवार असे मृत पित्याचे नाव आहे.
अजनूज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी रविवारी दुपारी धोम-बलकवडीच्या कालव्यावर गेले होते. सोबत वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा शंभूराज पवार हादेखील गेला होता. ते गोधडी धूत असताना छोटा शंभूराज पाण्यात उतरला. त्यामुळे प्रवाहात तो वाहत गेला. त्याला वाचविण्यासाठी विक्रम यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची गती अधिक असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.
ग्रामस्थ व रेस्क्यू टीमने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तासांत कालव्याच्या प्रवाहात मुलगा शंभूराजचा मृतदेह आढळून आला. मात्र, पित्याचा शोध लागला नाही. कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांनी रात्रभर शोधकार्य सुरूच ठेवले. सकाळी पाणी कमी झाल्यावर तब्बल २० तासांनंतर विक्रम पवार यांचा मृतदेह आढळला. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |