05:38pm | Apr 05, 2022 |
कोरेगाव : वरणें, ता. सातारा येथील निकृष्ट दर्जाचा झालेल्या १०० फूट रस्त्याची पुनर्बांधणी करून देऊ अशी ग्वाही उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा यांनी रमेश उबाळे यांना पत्राद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरणें, ता. सातारा येथे आमदार स्थानिक विकास फँड २०२०-२१ मधून रस्ता मंजूर झाला होऊन या रस्त्याचे काम दोन तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर फक्त तीन महिन्यांत हा रस्ता उखडून पडून वाहने रस्त्यावरून गेल्यानंतर धुरळा बाहेर येऊ लागल्यानंतर वरणें येथील ग्रामस्थांनी सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचकडे केली. परंतु, ग्रामस्थांच्या म्हणण्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थांनी सातारा येथे जाऊन रमेश उबाळे यांची भेट घेऊन सदर रस्ता निकृष्ट झाल्याचे म्हणणे व्यक्त करत रमेश उबाळे यांना सदर कामात लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर रमेश उबाळे यांनी वरणें येथे जाऊन रस्त्याची पाहणी करून मोजणी केली असता टेंडरप्रमाणे न होता सदर रस्ता एम २० ग्रेड नव्हता रस्त्याची जाडी कमी होती केवळ तीन महिन्यापूर्वी झालेला उखडून पडून धुरळा बाहेर पडत असल्याने रमेश उबाळे यांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन निवेदनात रस्त्याची परिस्थिती मांडून या रस्त्याची पुनर्बांधणी करून द्या अशी मागणी केली.
बांधकाम विभागाने उबाळे यांच्या निवेदनाकडेही लक्ष दिले नसल्याने अखेर रमेश उबाळे यांनी दि. २५ मार्च रोजी एक दिवसाचे लक्षणीक उपोषण करत बांधकाम विभागाचा निषेध केला होता. अखेर बांधकाम विभागा व ठेकेदार यांनी संगणमत करून सदर रस्त्याची खोटी कागदपत्रे रंगवून सादर केल्यानंतर रमेश उबाळे यांनी बांधकाम विभागावर टीकेची झोड उठवत जीवाची पर्वा न करता बांधकाम विभागाविरोधात दि. २५ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची पाहणी केली असता या रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याचे त्यांना आढळुन आल्याने त्यांनी झालेल्या १०० फूट रस्त्याची पुनर्बांधणी करून देण्याची ग्वाही दिली आहे.
उपोषण अद्याप मागे घेतले नाही
रमेश उबाळे यांना वरणें येथील रस्त्याची पुनर्बांधणी करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दि.२५ मार्च रोजीचे उपोषण मागे घेणार का? असा सवाल केला असता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आपण आपले उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.
माझ्या एकट्याचे श्रेय नाही
राजकारण तसेच समाजकारणात आपण प्रामाणिकपणे काम करत आहे. रस्त्याची काम जनतेच्या पैशातून होत असतात या पैशाचा अपव्यय करणे हे चुकीचे आहे. वास्तविक अतिशय कष्टाने मंत्रालयातुन फँड आणत असतात प्रशसकीय अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेचे पैसे वाया घालवू नयेत, असे आपले मत असून या कामात मला प्रसार माध्यमांचे खूप सहकार्य लाभले असून हा चौथा खांब आजही लोकशाहीचे रक्षण करत असल्याबद्दल प्रसारमाध्यमांचे रमेश उबाळे यांनी आभार मानले. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसून यामध्ये ग्रामस्थ व प्रसार माध्यमांचा खारीचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
रमेश उबाळे यांना आल्या हजारो लाईक
वरणें येथील निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याचा प्रश्न धडसाने उचलून धरल्यानंतर अखेर बांधकाम विभागाला आपली चूक लक्षात येऊन त्यांनी रमेश उबाळे यांना निकृष्ट रस्त्याची पुनर्बांधणी करून देणार असल्याचे पत्र दिल्यानंतर उबाळे यांनी हे पत्र सोशल मीडियावरील व्हाट्स अप स्टेटस व फेसबुक ला ठेवल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर हजारो अभिनंदनाच्या लाईक आल्या.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |