मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यात केवळ पाच जागा आल्या आहेत. यापैकी दोन जागांवरच अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. तर उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर मित्र पक्षांचे उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि एक जागा महायुतीला पाठिंबा दिलेल्या मित्र पक्षाला सोडावी लागली. त्यामुळे खऱ्या अर्थाने अजित पवार गटाच्या वाट्याला दोनच जागा आल्याची चर्चा आहे.
२०१९ रोजी राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. यापैकी सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर) आणि श्रीनिवास पाटील (सातारा) हे तीन खासदार शरद पवारांबरोबर राहिले. तर सुनील तटकरे (रायगड) हे अजित पवार गटाबरोबर गेले. जागा वाटपात विद्यमान खासदारांच्या चार जागा कायम राहाव्यात आणि दोन ते तीन जागा अधिकच्या मिळाव्यात, अशी अजित पवार गटाची भूमिका होती.
बारामती, रायगड, उस्मानाबाद, शिरूर आणि परभणी या पाच जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आल्या. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. तर रायगडमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. हे दोनच मूळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत.
उस्मानाबाद मतदारसंघात भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन अजित पवार गटाने उमेदवारी दिली. तर शिरूरमध्ये शिंदे सेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेत उमेदवारी दिली.
परभणी मतदारसंघ मित्र पक्षाला सोडावा लागला. तेथून महायुतीचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रिंगणात आहेत.
साताऱ्यात राजे नडले.....
भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी अजित पवार गटाने सातारा मतदारसंघावर पाणी सोडले. त्या बदल्यात नाशिकची जागा भुजबळ यांच्यासाठी मिळणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, शिंदेसेनेने हट्ट कायम ठेवल्याने अखेर नाशिकवरील दावाही सोडावा लागला.
आम्ही चारपेक्षा कमी जागा लढलो असतो तर नुकसान झाले असते. शिंदेसेनेकडे १३ खासदार असूनही त्यांना १३ जागा मिळण्यात अडचण होत आहे. शरद पवारांनीही बाहेरील नेत्यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. - आनंद परांजपे, प्रवक्ते, अजित पवार गट
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |