पाटण : किल्ले सुंदरगडावर (दात्तेगड) शिवजन्मोत्सवासह शिवयात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषातील शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन हारफुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवप्रतिमा ठेवून छत्रपतींचा सामुहिक पाळणा म्हटला. यावेळी शिवमावळ्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देऊन गडावर शिवकालीन वातावरण तयार केले.
किल्ले सुंदरगडावरील शिवजन्मोत्सव, पालखी सोहळ्यात सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे, टोळेवाडी-घेरादातेगड, पिपंळोशी ग्रामस्थ, पाटण पोलिस स्टेशन पोलिस जवान, पत्रकार, गड परिसरातील अबालवृद्धासह, शिवमावळे, शिवकन्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या जन्मोत्सव सोहळ्यानंतर सुंदरगडावरुन हारफुलांनी सजवलेल्या पालखीतून शिवप्रतिमेची पारंपारिक वाद्य झांज पथकाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला शिवमावळ्यांसह शिवकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मिरवणुकीत संत शिरोमणी तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी ता. पाटण यांचे बालगोपाळांचे दिंडी पथक आणि न्यु इंग्लिश स्कूल घाणबी-वाटोळे यांचे झांज पथक या मिरवणूकीचे आकर्षण ठरले. यावेळी उपस्थित शिवमावळे, शिवकन्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देत गड दणाणून सोडला.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासून सुंदरगडावर शिवमावळ्यांची शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी लगबग सुरु होती. आदल्या दिवशी गडावर आलेल्या शिवमावळ्यांनी गडाची स्वच्छता केली. गडावरील सर्व देवदैवत्तांचे पूजन करून गड भगव्या पताक्यांनी सजविण्यात आला. रात्रभर सुंदरगडावर शिवज्योतींचे आगमन सुरु होते. यावेळी परिसरातील भजनी मंडळांनी शिवजागर घातला. शनिवारी पहाटे गडाच्या खंजीर दरवाजात सडा शिपंडून शिवकन्यांनी रांगोळी काढली. बाल छत्रपतींचा पाळणा हारफुलांनी सजविला. व शिवप्रतिमेचे पुजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थित शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सामुहिक पाळणा म्हटला.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |