12:28pm | Sep 14, 2023 |
सातारा : पुणे - बंगळूरु आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यात शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला. फुटलेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीन ठार झाले असून मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. याबाबत घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत बुधवारी रात्री आयशर (केए २२ एए १५४१) ट्रकने दुसऱ्या (केए ५३ सी ८३४३) ट्रकला जोरदार धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने चालक टायर बदलत असल्याने ट्रक उभा होता. यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीम तात्काळ धटनास्थळ दाखल झाली. पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह अन्य दोघेजण होते. अपघातात आयशर ट्रकची केबीन चेपल्याने तिघेही अडकले होते. या जखमींना बाहेर काढून शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी शिरवळ पोलिसांनी हलविले. मात्र, उपचारापूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांची नावे अद्यापही समजलेली नाहीत. या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. सुमारे तासभरानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. शिरवळ पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |