01:03pm | Mar 02, 2024 |
कराड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटके, ता. कराड येथील चौघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नंदकुमार यादव (रा. भिलवडी स्टेशन, ता. पलुस) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
पती संदीप भगवान पाटील, सासरा भगवान पाटील, सासू पार्वती भगवान पाटील व नणंद दीपाली भगवान पाटील (सर्व रा. आटके, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर कोमल संदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटके येथील संदीप पाटील याचा भिलवडी स्टेशन येथील कोमल हिच्याशी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी विवाह झाला होता.
विवाहानंतर दोन वर्षे सासरच्यांनी कोमलला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी कौटुंबिक कारणावरून तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण सुरू केली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्याशी वाद घालून मारहाण केल्यामुळे कोमल माहेरी भिलवडी येथे गेली. त्यावेळी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील समुपदेशन कक्षात तक्रार नोंदवून पती संदीपसह इतरांना समज देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडून कोमलला त्रास दिला जात होता.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती संदीप याने कोमलचा भाऊ आकाश याला फोन करून कोमल माहेरी आली आहे का, अशी विचारणा केली. तसेच ती घरात नसल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरचे नातेवाईक तातडीने आटके येथे आले. त्यावेळी एका विहिरीत चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली. ग्रामस्थांना संशय आल्यामुळे त्यांनी विहिरीत शोध घेतला असता कोमलचा मृतदेह आढळून आला.
सासरच्यांनी दिलेल्या शारीरिक, मानसिक त्रासामुळे कोमलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आकाश यादव यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करीत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |