कराड : खंडणीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुंडावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय तुकाराम खडतरे (रा. गाय मंदिराजवळ, कार्वेनाका, कराड) या युवकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर मार्क फर्नांडिस (रा. दत्त बकुळा कॉलनी, गाय मंदिराजवळ, कार्वे नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वेनाका येथील विजय खडतरे हा युवक गवंडी काम करतो.
दोन दिवसांपूर्वी तो कार्वेनाका येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी केला होता. त्यावेळी मयूर फर्नांडिस हा त्याच्या मित्रांसह त्याठिकाणी आला होता. जेवण सुरू असताना त्याचा मित्रांसोबत वाद झाला. हा वाद सुरू असतानाच विजय तेथून घरी निघून गेला.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मयूर फर्नांडिस हा विजयच्या घराजवळ आला. त्याने त्याच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. त्यामुळे विजयने दार उघडले असता मयूरने त्याला शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने मारहाण केली. तुला मस्ती आली आहे. मी कऱ्हाडचा दादा आहे. तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून त्याने विजयला खाली पाडले. त्याच्या पॅन्टच्या खिशातील अडीच हजार रुपये काढून घेतले. प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये मला द्यायचे. नाहीतर तुझ्या वडिलांचा खून करीन, असे म्हणत मयूर फर्नांडिस याने विजय खडतरे याला दमदाटी केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. याबाबत विजय खडतरे याने दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे तपास करीत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |