10:04pm | Apr 09, 2023 |
फलटण : फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व समावेशक भव्य पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
फलटण तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने साजरी होणारी शिवजयंती यंदाच्या वर्षी फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात व पारंपारिक पद्धतीने करण्याचा निर्णय फलटण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीला सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साह साजरी करण्याचे ठरले असून याच पार्श्वभूमीवर फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सर्व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते या यावर्षी सर्व समाजातील महापुरुषांचा मिरवणूक मध्ये समावेश करण्यात आला असून प्रत्येक समाज आपापल्या महापुरुषांच्या प्रतिमा सजावट करून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीची आगळीवेगळी परंपरा फलटण तालुक्यात निर्माण होणार आहे. या बैठकीमध्ये प्रल्हादराव सोळुंके पाटील यांनी एक लाख 1111 रुपये, सचिन सूर्यवंशी बेडके यांनी 51 हजार रुपये, महात्मा ज्योतिबा फुले मंडळ विडणी यांच्या वतीने एक लाख, समाजाच्या वतीने 51 हजार, वडार समाजाच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा, रामोशी समाजाच्या वतीने 25 हजार, मुस्लिम समाजाच्या वतीने 51हजार, समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने 51 हजार, विश्वासराव भोसले यांच्या वतीने 25000, अंशुमन नाईक निंबाळकर यांच्या वतीने 25000, सागर शहा यांच्या वतीने 51 हजार, इंदिरानगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 11000, सोमवार पेठ कुंची कोरवा समाजाच्या वतीने 11000, सोमवार पेठ भिम शक्ती मंडळाच्या वतीने पाच हजार 555, मलटण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 51 हजार, पलतीफ तांबोळी यांच्या वतीने 25000, सचिन कांबळे पाटील यांच्या वतीने 5000, डॉक्टर जी टी पोळ यांच्या वतीने 10 हजार,बीके भाऊ यांच्या स्मरणार्थ 22000, जय हिंद गणेशोत्सव मंडळ पवार गल्ली 5 हजार, डॉक्टर श्रीवास्तव, संजय पवार, जयवंतराव केंजळे, आत्माराम सस्ते, राजेंद्र चोरमले यांच्या प्रत्येकी 5000,बी टी.जगताप यांच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराजांच्या दोन ट्रायली सजावट करून, घाडगे अण्णा यांच्यावर 2100, बंडू मदने संतोष सावंत प्रत्येक 1000 इतकी वर्गणी पहिल्याच बैठकीत जमा झाली असून फलटण तालुक्यात एक आदर्शवत अशी भव्य शाही मिरवणूक काढण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |