07:32pm | Jul 25, 2022 |
खंडाळा : विधान सभेचे सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिरवळ येथे मोबाइल वरून शिरवळ येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना मजबूत करण्यासाठी सहकार्य करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
शिरवळ येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा व शिरवळ येथील अनेक कार्यकर्ते शाखाप्रमुख यांचा मोठा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिलाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हयात प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभा करायचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांना ताकद मिळणे गरजेचे आहे. मी स्वार्थासाठी राजकारणात आलो नाही. सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठीच तालुक्यात मुख्यमंत्र्यां च्या नेतृत्वाखाली बांधणी करणार असल्याचे शिवसेना मा. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी दूरध्वनीवरून विधानसभेचे प्रतोद शिवसेना नेते आमदार भरतजी गोगावले यांनी सर्व शिवसैनिक व पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात ते म्हणाले सर्वांनी एकदिलाने काम करा आव्हाने मोठी आहेत त्यासाठी संघटनात्मक पातळीवर कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. विकासाचे प्रश्न आपण एकजुटीने मार्गी लावू अशी ठाम ग्वाही गोगावले यांनी दिली.
या बैठकीसाठी जिल्हयाचे नेते पुरुषोत्तम जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, शिवसेना खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, युवासेना जिल्हा सचिव शरद जाधव, वाई विधानसभा मा. संघटक अंकुश आप्पा महांगरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खंडाळा तालुकाप्रमुख मंगेश खंडागळे, शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, तज्ञ संचालक लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती भूषण शिंदे, लोणंद शहर शिवसेना नेते विश्वास शिरतोडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना मा. संचालक भानुदास जाधव, युवासेना तालुकाप्रमुख समीर वीर, शिवसेना विभाग प्रमुख सागर ढमाळ, महाराष्ट्र चॅम्पियन पै. नवनाथ शेंडगे, शिवसेना शिरवळ खजिनदार बाळा राऊत, युवा सेना शिरवळ शहरप्रमुख उमेश चव्हाण, खंडाळा तालुका समन्वय समिती सदस्य राजेंद्र जाधव,शिरवळ उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भांडे, शिवसेना मा. उप तालुकाप्रमुख लक्ष्मणराव जाधव, खंडाळा तालुका शेतकरी कृती समिती अर्जुनराव जगताप, कुंडलिकराव दगडे, युवासेना विभाग प्रमुख अमर शिंदे, शिवसेना उपविभाग प्रमुख तेजस सुतार, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता जाधव, पळशी उपसरपंच एकनाथ भरगुडे, पारगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, खंडाळा उपशहर प्रमुख प्रमोद शिंदे, संजय जाधव, हिंदुराव हाके, अतिट ग्रामपंचायत मा. सरपंच निवृत्ती जाधव, शेतकरी संघटनेचे नेते प्रमोद जाधव, शिवसेना मा. विभाग प्रमुख रमजान मुजावर, गणेश पवार, शिवाजी माने शरद ताटे चंद्रकांत माने, बाळासो जाधव यांसह प्रमुख पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटी चेअरमन, संचालक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप माने म्हणाले, तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचे काम पुरुषोत्तम जाधव यांनी केले; परंतु इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व प्रश्न निधी अभावी रखडू नयेत म्हणून सध्याच्या घडामोडीत गावोगावची विकासकामे मार्गी लावण्यासाठी व शिवसैनिकाला ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या माणसांचा गावाशी संबंध नाही, लोकांशी संपर्क नाही अशांना पदे दिल्यावर शिवसेना कशी वाढणार, असा प्रश्नही विश्वास शिरतोडे यांनी उपस्थित केला. यापुढे शिंदे गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भूषण शिंदे, निवृत्ती जाधव, राजेंद्र सोनवणे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष कुंडलिक महाराज दगडे यांनी आपले विचार मांडले.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |