महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात मेटतळे गावानजिक एका वळणावर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी तब्बल ३०० ते ४०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की टाटा योद्धा गाडीची ट्रायल घेण्यासाठी महाबळेश्वर वरून पोलादपूरच्या दिशेने गेलेली गाडी आंबेनळी घाटाने प्रवास करत होती. मेटतळे गावाच्या नजिक एका वळणावर गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तब्बल ३०० ते ४०० फुट खोल दरीत कोसळली. त्याच रस्त्याने प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीमचे जवान संकेत सावंत हे देखील प्रवास करत होते. त्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी ही माहिती महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीमच्या जवानांना तातडीने दिली.
क्षणाचाही विलंब न करता दोन्ही टीमचे सदस्य घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर दोन्ही टीमच्या जवानांनी खोल दरी पाहून रोपच्या साहाय्याने दरीत उतरायला सुरुवात केली. जवळ जवळ अर्ध्या तासामध्ये पहिल्या जखमीला बाहेर काढण्यात दोन्ही टीमच्या जवानांना यश आले. दुसऱ्या जखमी व्यक्तीला १ तासाच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही जखमीना जिवंत बाहेर काढले. यामुळे दोन्ही टीमच्या जवानांचे कौतुक होत आहे.
या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीमचे संकेत सावंत, अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, मुन्ना उतेकर, प्रसाद जाधव, मयुरेश जाधव तर महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, अनिल केळगणे, सुनील केळगणे, सुनील वाडकर, जयवंत बिरामणे, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, अमित झाडे, निलेश बावळेकर, सनी बावळेकर, अक्षय नाविलकर, ओंकार नाविलकर, सौरभ गोळे, निखिल कांबळे हे जवान सहभागी होते.
खासदार उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |

ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |