कराड : जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला. तर हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. म्होप्रे, ता. कराड येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्रकाश बाबुराव सकपाळ-पाटील (वय ६०) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर किशोर सकपाळ-पाटील, किरण सकपाळ-पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. रणजीत जाधव (रा. गोळेश्वर), अनिल सकपाळ, सुनील सकपाळ अशी संशयीतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील प्रकाश सकपाळ-पाटील आणि अनिल सकपाळ यांच्यात जमिनीचा वाद होता. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश सकपाळ-पाटील हे म्होप्रे येथील बसथांब्यानजीक असताना संशयित तिघे त्याठिकाणी आले. त्यांनी प्रकाश सकपाळ-पाटील यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घातला. या वादातूनच त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यावेळी संशयतांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने प्रकाश यांना भोकसले. तसेच त्याठिकाणी असलेल्या किशोर व किरण सकपाळ-पाटील या दोघांवरही शस्त्राने वार करण्यात आले.
घटनेची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. रात्री पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |