12:19am | Oct 05, 2020 |
कोरेगाव : येथे भरवस्तीमध्ये एकाचा खून व दुसऱ्याचा हाफ मर्डर झाल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या पथकाने विजय उर्फ दाजीबा संजय नालट (वय ३० रा. कोरेगाव) याला अटक केली. संशयिताला दोघांनी दारू पीत असताना पाणी मागितले. ते दाजीबा याने न दिल्याने दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे चिडलेल्या दाजीबा याने लाकडी दांडक्याने एकाचा मर्डर तर दुसऱ्याचा हाफ मर्डर केला.
सुनील नंदकुमार घोरपडे असे खून झालेल्याचे नाव आहे, तर आनंदा बाळू जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी दुपारी कोरेगाव आनंदा जाधव व त्यांचा सहकारी सुनील घोरपडे हे दौलत टॉकीज जवळ दारू पित बसले होते. त्यावेळी तेथे दाजीबा देखील बाजूला बसला होता. संबधित दोघांनी दाजीबा याला पाणी मागितले. पाणी देण्यास नकार दिल्याने सुनील घोरपडे व आंनदा जाधव यांनी दाजीबाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाण झाल्याने दाजीबा चिडला व त्याने परिसरात पडलेले लाकडी दांडके घेतले व दोघांवर हल्ला चढवला. या घटनेत घोरपडे जागीच ठार झाले, तर जाधव गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संशयित दाजीबा याने तेथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवार, रविवार असा दोन दिवस कोरेगाव व एलसीबी पोलिसांचा तपास सुरू होता. रविवारी दुपारी संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांजवळ संशयिताने घडलेला घटनाक्रम सांगून गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पो. नि. सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व कोरेगाव पोलिसांनी सहभाग घेतला.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |