04:17pm | Aug 12, 2022 |
सातारा : शासकीय पातळीवर दंडात्मक कारवाई करूनही दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या कंपनीला आज महसूल विभागाने हिसका दाखविला. खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सातारा-पंढरपूर रस्त्यावरील कामांची वाहने जप्त करून वडूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यातच पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कारवाई झाल्याने सुमारे पावणे सात कोटी रुपयांचा माल ही वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सदर प्रकरणी कारवाई करून दंड वसूल करावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आंदोलनाची भूमिका घेतली होती.तत्पूर्वी खटाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी अभय शिंदे, निनाद जाधव, किशोर घनवट, गणेश पिसे, सुनील सत्रे, गणेश राजमाने, गौरव खटावकर, एस व्ही बदडे यांनी दुपारी एक वाजता पुसेगाव-निढळ रस्त्यावर पाच मिक्सर, तीन डंपर, तीन ट्रॅक्टर, व दोन पोकलांड अशी तेरा वाहने ताब्यात घेतली. सदर वाहने वडूज येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. मेगा इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड कंपनीने गौण खनिजचा वापर करूनही शंभर कोटी रुपयांचा दंड न भरल्याने खटाव तहसीलदार जमदाडे यांनी कारवाई केली होती.त्यानंतर दंड वसूल न झाल्याने पुढील कारवाई चा भाग म्हणून वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण पावणे सात कोटी रुपयांची वाहने जप्त केली आहेत. या कारवाई चे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
१०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याशिवाय कोणतेही आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. तसेच ८० हजार ब्रास खडीचा वापर संबधित कंपनीने करू नये असा खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांनी आदेश दिला आहे.या खडीची बाजार भावा प्रमाणे साडेसात कोटी रुपये एवढी किंमत आहे. पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने सामान्य जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. एखादया प्रकरणात पाठपुरावा केल्याशिवाय न्याय मिळत नाही. याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |