सातारा : आपल्या गीत व गायनातून प्रबोधन करणारे सायगाव, ता. जावळी येथील तरुण प्रबोधनकार गायक शिवाजी सर्जेराव जगताप यांची आज सातारा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये प्राणज्योत मालवली.
सायगाव विकास सोसायटी मध्ये सह सचिव म्हणून कार्यरत असलेल्या जगताप यांनी शेतकऱ्यांना विकास सोसायटीमार्फत विविध कर्ज मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले होते. 20 दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचे लागण झाल्याचे चाचणीवरून स्पष्ट झाले. त्यानंतर खाजगी रुग्णालय व कोविड सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची पुतणी डॉ. सुप्रिया जगताप यासुद्धा उपचारासाठी सहकार्य करत होत्या. पण, अखेर अपयश आले. 'कोरोनाला पळवून लावू या, देश सुरक्षित ठेवू या' हे गीत त्यांनी पहिल्या टप्प्याच्या कोरोनाच्या वेळी सादर केले होते. या गीताची निर्मिती त्यांचे थोरले बंधू नंदकुमार जगताप यांनी केली होती. या गीताचे कौतुक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात झाले होते.
कोरोनाबाबत जनजागृती करणाऱ्या गायक शिवाजी जगताप यांचे कोरोनामुळेच निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आशालता यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे गायन क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक प्राप्त केले होते. तरुण गायकाच्या निघून जाण्याने कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून नि:स्वार्थीपणाने कला सादर करणाऱ्या या गायकाचा मोठा मित्र परिवार आहे. तसेच त्यांच्या मागे एक बंधू, वहिनी, पुतण्या व पुतणी तसेच पत्नी, मुलगा व मुलगी आहे. बौद्धविकास सेवा संघाच्या मार्फत माजी अध्यक्ष प्रेमानंद जगताप, पटकथा लेखक प्रताप गंगावणे, सिने कलावंत समृध्दी जाधव, उत्तम जगताप व मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दोन वर्षांच्या काळात तीन तरुण बंधूंचे आकस्मित निधन झाल्याने जगताप कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |