सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या दोघांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. ऋतिक जितेंद्र शिंदे, वय २३, रा. गोडोली, ता. सातारा आणि अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव, वय २८, रा. बसप्पा पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात ऋतिक शिंदे आणि अक्षय उर्फ बॉम्बे जाधव यांच्या विरोधात गर्दी, मारामारी, आदेशाचा भंग, दुखापत करणे, शिवीगाळ करून दमदाटी, अपहरण करणे, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
संबंधित दोघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. त्यांच्याकडून हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी त्या दोघांनाही सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. अजय बन्सल यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत १५१ जणांना तडीपार केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |