09:00pm | Mar 04, 2021 |
सातारा : घरातच हरवलेला मोबाईल शोधताना घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले. आई-बाबांनी सारा प्रकार पाहिला तर आपल्याला अजून मार खावा लागेल. या भितीपोटी एका अल्पवयीन मुलाने घरात चोरी झाली असल्याचा बनाव केला. पोलिसांनी तात्काळ या घटनेचा छडा लावून चोरी नसून चोरीचा बनाव असल्याचे सत्य उघडकीस आणताच वडिलांनी मुलाच्या या कृत्याबद्दल वाई पोलिसांची माफी मागितली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बावधन गावात दि. 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. हणमंत अशोक पिसाळ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करून पोबारा केला आहे. अशी माहिती वाई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक आनंदराव खोवरे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी यांनी घटनारथळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करुन हणमंत पिसाळ व त्यांचा ईयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेला गोठा मुलगा वय- 11 वर्षे याच्याकडे विचारपूस करता मुलाने सांगितले की, आई वडील सकाळी 08.00 वाजता कामाला गेले नंतर 09.30 वाजण्याच्या सुमारास आजी श्रीमती निर्मला अशोक पिसाळही रानात गेली. त्यानंतर मी घरात एकाटाच दरवाजा खिडक्या आतून बंद करुन बसलो असताना एका माणसाने बाहेरून दरवाजा वाजवला म्हणून मी खिडकीतून काय पाहीजे, असे विचारले असता काकाला डबा दे असा तो माणूस म्हणाल्याने मी दरवाजा उघडला असता मला धक्का देवून घरामध्ये तीन मोठी माणसे व एक 15-16 वर्षाचा मुलगा आला त्यांच्यापैकी एकाने माझे तोंड दाबून मला बुक्क्या मारल्या व लॉकरची चावी मागत होते. मी त्यांना चावी नाही असे म्हणालो, तेव्हा इतर त्याचे साथीदार घरातील कपाट, पेटया व डबे उकटत होते. मला पकडलेल्या माणसाने माझे तोंड दाबून माझ्या पायात भुलीचे इंजेक्शन देण्याचा प्रयन्त केला. तेव्हा मी त्यास लाथ मारल्याने भुलीचे इंजेक्शन त्याचेच दंडात घुसले व तो खाली पडला. त्यावेळी मी दरवाजाची कडी काढून पळून गेलो. मी पळून गेल्याने ते लोक त्यांच्या पडलेल्या साथीदाराला उचलून घेवून मागच्यादाराने पळून गेले व रोडवर उभा असलेल्या बलोरो सारख्या गाडीत बसून निघून गेले. मी ओरडत शेजार्यांच्या घरी गेलो व त्यांना घडलेला प्रकार सांगून वडीलांना फोन करुन बोलविण्यास सांगितले. थोडयाच वेळात वडील घरी आले. अशी हकिगत सांगितली.
सर्व हकिकत समजल्यानंतर सदरचा मुलगा सांगत असलेला प्रकार व घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पोलिसांना शंका आली. लहान मुलगा काहीतरी चुकीची माहिती सांगत असल्याचे वाटल्याने त्यास प्रेमाने व विश्वासात घेवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, आज सकाळी आई बाबा कामावर गेल्यानंतर आजीने तीचा मोबाईल सापडत नव्हता म्हणून मीच मोबाईल घेतला आहे, असे समजून मला चप्पलने खूप मारले. त्यानंतर आजी रानात गेली व मी तीचा मोबाईल शोधत असताना माझ्याकडून घरातील कपाटातल्या साडया खाली पडल्या, पेटी वरुन खाली पडली तसेच धान्याचे डबे खाली पडले. तेव्हा मला डब्यात आजीचा मोबाईल डब्यात सापडला. परंतू घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते व आई बाबा परत घरी आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले साहीत्य पाहून मला मारतील म्हणून मी भिती पोटी घरात चोरी झाली आहे असे बाबांना फोन करुन सांगितले होते, असे सांगितले.
अखेर पोलिसांनी या चोरीचा बनाव उघडकीस आणला. त्यानंतर मुलाने सांगितलेली हकिगत त्याचे वडील हणमंत पिसाळ यांना सांगितली असता त्यांनी माझ्या मुलामुळे पोलिसांना त्रास झाला असून त्याबद्दल माफी मागतो, असे उद्गार काढले.
सदरची कारवाई वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस नाईक प्रशांत शिंदे, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी सहभाग घेतला होता.
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |
दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू |