दिल्ली : तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पुढील महिन्यासाठी पुढे ढकलत आहात का ? जर उत्तर 'हो' असेल तर ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे सर्व कामे वेळेत करा. ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबरपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर 5 ऑक्टोबरपासून दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सुट्या सुरू होणार आहेत. तर 24 ऑक्टोबरला दिवाळीची सुट्टी आहे.
ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार-रविवारसह देशभरातील खासगी आणि सरकारी बँका एकूण 21 दिवस बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात पाच रविवार असतात. दुर्गापूजा, दसरा आणि दिवाळीसारखे सणही ऑक्टोबरमध्ये येतात. या बँक सुट्ट्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतात. भारतातील बँका राजपत्रित सुट्टीनुसार बंद आहेत. सर्व बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात, तर काही बँका प्रादेशिक सण आणि सुटीच्या दिवशी बंद असतात. स्थानिक बँकांच्या सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवतात. रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.
2 ऑक्टोबर रोजी रविवार आणि गांधी जयंतीची सुट्टी आहे. ३ ऑक्टोबर रोजी - दुर्गा पूजामुळे अगरताळा, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची येथील बँका बंद राहतील. 4 ऑक्टोबर रोजी अगरताळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, शिलाँग आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील. 5 ऑक्टोबरला दसरा सणामुळे देशभरात बँका बंद असतील. 6 व 7 ऑक्टोबरला गंगटोक येथे बँका बंद राहतील. 8 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार सुट्टी, 9 ऑक्टोबरला रविवारची सुट्टी आहे. त्यानंतर 13 ऑक्टोबरला शिमला भागातील बँका बंद राहतील. 16 ऑक्टोबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. 18 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बँका बंद असतील. 22 ऑक्टोबर चौथा शनिवार व 23 ऑक्टोबर रविवारची सुट्टी आहे.
24 ऑक्टोबर रोजी दीपावलीमुळे अगरताळा, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ , मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका बंद राहतील. 25 ऑक्टोबर रोजी गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूर येथील बँकांना सुट्टी आहे. 26 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, शिमला आणि श्रीनगर विभागातील बँका बंद राहतील. 27 ऑक्टोबर गंगटोक, इम्फाळ, कानपूर आणि लखनऊ येथे सुट्टी आहे. 30 ऑक्टोबर - रविवार 31 ऑक्टोबर अहमदाबाद, पाटणा विभागातील बँका बंद राहणार आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |