04:25pm | Jan 02, 2021 |
(प्रकाश राजेघाटगे)
बुध: ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवारीच्या निर्णयाला आता रंगत वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता माघारीसाठी खेळ्या खेळल्या जाणार आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत तर काही ठिकाणी बंडोबांना थोपविण्यासाठी गळ घातली जात आहे. माघार घेण्यासाठी संबंधितांना गोड बोलले जाईलही पण माघार घेण्यासाठी जो काही शब्द दिला जाणार असले तरी तो भविष्यात पाळणारच याची खात्री कोण देणार? हा प्रश्न संबंधित उमेदवाराला सतावत आहे.
खटाव तालुक्यातील 90 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.15 जानेवारीला मतदान होत आहे. भावी सरपंचांचा आता आखाडा तापला आहे. उमेदवारी अर्ज मोठया संख्येने दाखल झाले असून माघार कोण कोण घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून त्यांचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणार्यांना मागे घेण्यासाठी दबाव आल्याचे जाणवू लागले आहे. काही तरी आमिष दाखवून निवडणूक लढविण्यापासून माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मिती केला जाणार आहे.
इच्छुकांच्या अपेक्षा धुळीस
निवडणूक विभागाने अचानकपणे निवडणूक निकालानंतर सरपंचपदाची आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. गावचे सरपंचपद मोठ्या सन्मानाचे मानले जाते. यामुळे या पदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी म्हणून अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसले होते. परंतू या निर्णयाने इच्छुकांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत.
समोरच्या गटात खुल्या जागासाठीही गळ
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली. गावागावात निवडणुकीसाठी आघाडी आणि बिनविरोध निवडणूक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सरपंच पदाचे आरक्षण कोणते पडणार? याची खात्री देता येत नाही. आपल्या जागेवरील सरपंचपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ति चालते परंतू सरपंच आरक्षित असल्याने तेही त्यांच्या प्रवर्गातील सदस्य लागतो. प्रत्येक गटात आपल्यालाच सरपंचपद मिळावे म्हणून आघाडी आणि आरक्षित जागा अधिकाअधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |