01:07pm | Apr 30, 2021 |
नवी दिल्ली : पद्मथवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे निधन झाले. दिल्ली येथील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. करोना संक्रमित आढळल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सोली सोराबजी यांचा जन्म 1930 साली मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला होता. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. 1953 सालापासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती. ते 1971 साली सर्वोच्च न्यायालयाचे सीनिअर काऊन्सिल बनले होते. 1977 - 1980 पर्यंत त्यानी देशाचे सॉलिसिटर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर देशाचे अॅटर्नी जनरल या पदाची जबाबदारी हाताळण्याची संधी त्यांना दोन वेळेस मिळाली. पहिल्यांदा सोराबजी यांनी 1989 ते 1990 पर्यंत ‘भारताचे अॅटर्नी जनरल’ म्हणून जबाबदारी हाताळली त्यानंतर पुन्हा एकदा 1998 ते 2004 पर्यंत त्यांनी या पदाची सूत्रं सांभाळली.
जवळपास सात दशकं सोली सोराबजी कायदेक्षेत्रात कार्यरत राहिले. या दरम्यान त्यांनी मानवाधिकाराची अनेक प्रकरणं हाताळली आणि विजयही मिळवला. मार्च 2002 मध्ये त्यांना मानवाधिकारांचं संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी ‘पद्म विभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
मार्च 2006 साली ऑस्ट्रेलिया आणि भारता दरम्यान ‘बायलॅटरल लीगल रिलेशन्स’च्या कामासाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चे ‘ऑनररी मेम्बर’ म्हणून निवडण्यात आलं.
1997 साली ‘युनायटेड नेशन्स’नं त्यांना नायजेरियात मानवाधिकारांच्या स्थितीवर रिपोर्ट तयार करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |