03:23pm | Aug 19, 2020 |
कराड: कराड शहरालगत असलेल्या सैदापूर- विद्यानगर परिसरात कोरोना परिस्थितीत जीवाची बाजी लाऊन कोरोना योध्दा म्हणून अहोरात्र काम करणारे सैदापूर ग्रामपंचायतीचे तलाठी लालासाहेब शिंदे यांचा सत्कार सैदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सैदापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपिका जाधव, उपसरपंच फत्तेसिंह जाधव, माजी उपसरपंच मोहनराव जाधव, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, पोलिस पाटील संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीश उर्फ नाना जाधव यांची उपस्थिती होती.
गेल्या चार महिन्यापासून कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीतून नागरिक जात असताना त्यांना दिलासा देण्याचे काम सैदापूर येथील तलाठी लालासाहेब साळुंखे यांनी केले आहे. कराड शहरालगत असलेल्या विद्यानगर सैदापूर परिसरात 25 हजार पेक्षा जास्त नागरिक राहतात. विशेषता विद्या नगर परिसरात बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या परिसरात सुरुवातीच्या काळात बाहेरून येणार्या लोकांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज होती. याचबरोबर विद्यानगर, सैदापूर परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन आरोग्यसेवा पुरवण्यात लालासाहेब साळुंखे यांचा मोलाचा वाटा आहे.
कोरोना परिस्थिती सांभाळत असताना नित्याची कामे करण्यात लालासाहेब साळुंखे हे कधीही मागे पडले नाहीत. विद्यानगर सैदापूर या परिसरात शासकीय कर्मचारी म्हणून सदैव 16 तास ते काम करीत राहिले. त्यांच्या या कामाची दखल वरिष्ठांनी सुद्धा घेतली असून प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनीदेखील लालासाहेब साळुंखे यांचे कौतुक केले आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सैदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तलाठी लालासाहेब साळुंखे यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना लालासाहेब साळुंखे म्हणाले, लोक सेवा हीच ईश्वर सेवा मानून मी कोरोना परिस्थितीमध्ये आमच्या सर्व अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करीत राहिलो. सैदापुर, विद्यानगर, गोवारे हा शहरीकरणामधील भाग असून यामध्ये हे काम करताना स्थानिक प्रतिनिधींचे मोठे सहकार्य लाभले. कोरोना सारख्या परिस्थितीत काम करताना दिवसा रात्री काम केले. यामुळे आत्मिक समाधान लाभले यापुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने काम करीत राहणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |