वाई : वाई अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदाच्या १५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाबळेश्वरचे सहाय्यक निबंधक जनार्दन शिंदे यांनी दिली .
बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया दि. २२ मे पासून सुरू झाली असून शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. बँकेच्या संचालक पदाच्या १५ जागांमध्ये सर्वसाधारण गटासाठी (१०), महिलांसाठी राखीव ( दोन), अनुसुचित जाती-जमातीसाठी (एक), विमुक्त जाती., भटक्या जमाती व विशेष मागास वर्गासाठी (एक) तसेच इतर मागास वर्गासाठी (एक) अशी वर्गवारी आहे. मागील पाच दिवसांत ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, अँड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, डाँ. शेखर कांबळे, अनिल देव, राजगोपाल द्रविड यांचा समावेश आहे. तर माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे, विवेक पटवर्धन, माजी संचालक माधव कान्हेरे, काशीनाथ शेलार, सचिन गांधी, प्रशांत नागपूरकर, रमेश ओसवाल, दत्तात्रय मर्ढेकर, नंदकुमार ढगे, बाळकृष्ण पंडीत, मकरंद एरंडे, अशोक लोखंडे, स्वप्नील भिलारे, अनिल सावंत, पराग खोपडे, स्वप्नील जाधव, प्रवीण जगताप, यशवंत जमदाडे, दिलीप जमदाडे, मकरंद मुळ्ये, रवींद्र मेंहदळे, यशवंत लेले, प्रदिप चोरगे, अविनाश मेढेकर, अनिल शेंडे, ॲड. महेश राजेमहाडीक, अमित द्रविड, नरेंद्र गांधी, मनोज ओसवाल, दीपक हजारे, उमेश शहा, प्रमोद धाडीवाल, संजय धरमसी, विकास पिसाळ, संदीप खामकर, राखीव प्रवर्गातून सुधाकर वाईकर, अविनाश फरांदे, चंद्रशेखर ढवण, अतुल वाईकर, प्रीतम भूतकर, यशवंत जमदाडे, अरविंद आदलिंगे, अमर जमदाडे, चंद्रकांत गुजर, राजू खरात, गणेश जाधव, संतोष जाधव आदींनी अर्ज दाखल केले आहेत. तर महिला प्रवर्गातून अनुजा पटवर्धन, ज्योती गांधी, सुनीति गोवित्रीकर, सरिता जमदाडे, धनश्री ननावरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दि. २९ मे रोजी अर्जांची छाननी आहे. अर्ज मागे घेण्यासाठी दि. १३ जून पर्यंत मुदत आहे. दि. १४ जून रोजी चिन्ह वाटप होणार आहे. आवश्यकता वाटल्यास दि. २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. २७ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, असेही निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |