पुसेगाव : पुसेगाव परिसरातील खटाव, पुसेगाव, खातगुण येथे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. पुसेगाव येथील रुग्णसंख्या वाढल्याने पुसेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.
त्यामुळेच येथील सहा वॉर्डपैकी चार वॉर्ड प्रतिबंधीत क्षेत्र, तर सर्व वॉर्ड बफर झोन म्हणून प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी जाहीर केले आहेत. पुसेगव, खातगुण, विसापूर, फडतरवाडी, निढळ, कटगुण येथील दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता पुसेगाव परिसरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोविड सेंटरला लागूनच असलेले वार्ड क्र. चार व पाच हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. तर वॉर्ड क्रमांक सहा हा बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. याशिवाय पुसेगावातील वॉर्ड क्र. तीन व सहा हेही प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत झाले आहेत. गावातील सर्वच वॉर्ड हे बफर झोन म्हणून जाहीर झाले आहेत. आजही पुसेगाव, खातगुण व विसापूर या गावात प्रत्येकी दोन रुग्ण, तर फडतरवाडी (बुध) येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुसेगाव येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार यांच्या आदेशानुसार पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व पोलीस कर्मचारी यांनी कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जीवनावश्यक सेवा वगळता अन्य व्यक्तींना या परिसरात ये-जा करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |