02:54pm | Mar 07, 2021 |
सातारा: देशभरात दि.5 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सातारा जिल्हयातही उद्या सोमवार दि.8 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक वृत्त आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला उद्यापासून दि.8 मार्चपासून सुरूवात करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ठोसेघर, येवती, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनावडे ही प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस दिली जाणार आहे. नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुरबा सातारा व कराड या शासकीय रुणालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळीत लसीकरण मोफत देण्यात येत आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार दि. 5 मार्चपासून देशभरात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 59 वर्ष वयोगटातील इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातही हे लसीकरण सुरू असून, उद्यापासून (दि.8) 65 आरोग्य केंद्रातही ही लस उपलब्ध होणार आहे, असेही डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी नमूद केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |