03:21pm | Apr 12, 2021 |
मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 10 आणि 12 वीच्या परीक्षांबाबत राज्य शासन कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अनेक विद्यार्थी व पालकांमधून परीक्षा घेण्यास विरोध दर्शविण्यात आला होता. त्यानुसार आता राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 12 वी परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर 10 वी परीक्षा जून महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत 69 टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले. दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात 2,600 हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने पहिली ते आठवीप्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती म्हणजे परीक्षेविना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता थेट पास केलं जाणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी याआधीच केली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |