10:43pm | Mar 05, 2021 |
फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी ताथवडा, ता.फलटण गावाच्या हद्दीतील ताथवडा घाट रस्त्यावर दरोडा टाकणार्या टोळीला जेरबंद केले आहे.
योगेश बाजीराव मदने (वय 30 वर्षे रा राजापुर ता.खटाव जि.सातारा), सनी ऊर्फ सोन्या धनाजी भलकर (वय 23 वर्षे रा.चौधरवाडी ता.फलटण), प्रथमेश ऊर्फ सोनू हणमंत मदने (वय 21 वर्षे रा.उपळवे ता.फलटण जि.सातारा), किशोर हणमंत जाधव (वय 19 वर्षे रा.ताथवडा ता.फलटण) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, ताथवडा घाटात पेट्रोलिंग करीत असताना ताथवडा घाटाच्या दुसर्या वळणावर तिन पल्सर मोटर सायकल व तेथे थांबलेले सहाजण दिसल्याने पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजुनी घेरले. मात्र या सहाजणांमधील दोघेजण पोलिसांचा सुगावा लागताच मोटर सायकलवरून पळुन गेले. मात्र तेथे असलेल्या चारजणांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पळून गेलेले आरोपी महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (वय 25 वर्षे रा मोतीचौक फलटण ता फलटण) व किरण मदने पुर्ण नाव माहित नाही (रा राजापुर ता.खटाव जि. सातारा) यांची नावे समजली. हे सहाजण 80 हजार 40 रुपये किंमतीचा माल व हत्यारे जवळ बाळगून मौजे ताथवडा ता.फलटण हद्दीतील ताथवडा घाट रस्त्यावर दरोडा घालण्यासाठी एकत्र आले होते. त्यांच्या विरूद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे फलटण भाग फलटण व पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी करून संबंधित आरोपींना विश्वासात घेवून, त्यांची विचारपुस करून शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याची उकल केली. तपासामध्ये त्यांनी बजाज पल्सर मोटर सायकलवरून 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वा.चे सुमारास वीर धरणाच्या पात्रामध्ये काठावर बोलत बसलेल्या एका जोडप्यास दमदाटी करून त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने व मोबाईल बळजबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 30 हजार रूपये किंमतीची गळ्यातील सोन्याची चैन, त्याच्या मध्यभागी एक बदाम असलेली सोन्याची चैन व बदाम यासह 5 हजार रुपये किंमतीचा कानातील सोन्याचा 1 टॉप्सचा जोड, 5 हजार रूपये किंमतीचा एम.आय.नोट -4 कंपनीचा एक मोबाईल हॅन्डसेट हा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे फलटण भाग फलटण व पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोवले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पो.ना देवकर, पो.ना. तुपे, चालक पो. ना. यादव, पो.कॉ कुंभार, पो. ना. काशिद, पो.कॉ. जगदाळे, पो. कॉ. पाटोळे यांनी केली आहे.
मौजे सासकलचे ग्रामसेवक अंगराज जाधव यांच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थ नाराज |
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |

बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |