08:40pm | Mar 24, 2023 |
सातारा : गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये क्षय रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र या रोगाचा सुयोग्य उपचाराद्वारे नायनाट करणे शक्य आहे. त्यामुळे पोषक आहार आणि निक्षय मित्र योजनेच्या माध्यमातून क्षयरोगाचे उच्चाटन करूया. त्याकरिता ही योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येथील सातारा मेडिकल कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "टीबी हा एक संसर्गजन्य आजार असला तरी त्याचा संपूर्ण आणि सातत्यपूर्ण उपचाराद्वारे तो बरा होऊ शकतो. आपल्या देशाला क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा सातारा मध्ये जिल्हास्तर, तालुका स्तर आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे क्षयरोग दिनाच्या निमित्ताने विविध योजना सुरू आहेत. यापैकी निक्षय मित्र योजना आणि पूरक आहार योजना या योजनांचा संबंधित रुग्णांनी निश्चितच उपचार प्रणाली द्वारे लाभ घ्यावा आणि संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण देश क्षयमुक्त व्हावा, अशी अपेक्षा डॉक्टर चव्हाण यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्षयरोग केंद्र व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दीप प्रज्वलन व शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. बी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड, जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान मोहिते, डॉक्टर सुनील चव्हाण, बालविकास अधिकारी श्रीराम बोडके इत्यादी यावेळी उपस्थित होते
जास्तीत जास्त निक्षय मित्र होण्याकरिता सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनी व्यक्त केली. यानंतर शासकीय नर्सिंग महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 2022 मध्ये क्षयरोग निवारणासाठी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले व जिल्हा रुग्णालय सातारा येथे फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. क्षयरोग विषयी जनजागृती करता जिल्हा रुग्णालय ते पोवई नाका यादरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संजीवन नर्सिंग कॉलेज यांच्या 200 विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभाग घेतला होता. या प्रभात फेरीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |