05:27pm | Jun 23, 2022 |
मुंबई : संजय राऊतांच्या या विधानानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, आम्हाला कळत नाही. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?, त्यांना पुन्हा भाजपासोबत जायचं आहे का?, हे त्यांनी स्पष्ट करावं असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यू- टर्न घेतील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आमच्या हातात काहीच नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी २४ तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांच्या या विधानानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विट करत शिवसेनेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल, असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
२१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा
दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा संजय रऊत यांनी केला. ते म्हणाले की, मी इथे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील २१ आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला आहे. तसेच जर विधानसभेत हा संघर्ष आला तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय होईल, इतका आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |