04:22pm | Sep 13, 2021 |
सातारा : शिक्षण नाही, रोजगार नाही, रानावनात हिंडून मिळेल ते खावून परिस्थितीने चोऱ्यामाऱ्या करणे नशिबी असलेल्या पारधी समाजासह गोपाळ, कातकरी, वडार या भटक्या समाजासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी नसल्याने हजारो पारधी व वंचित जाती जागेसह घरकुलाच्या लाभापासूनही वंचित आहेत. त्याचा निषेध म्हणून दि. 15 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत राहूटी आंदोलन करत असल्याची माहिती लोकसाहित्यिक आण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.
याबाबत पारधी हक्क अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पारधी, कातकरी, गोपाळ, वडार यांच्यासह मराठा, बौध्द समाजातील अनेक लोकांना जागा नाही, घरकुले नाहीत. याबाबत प्रशासनास वारंवार निवेदन, मागणीपत्रे दिली आहेत. मात्र, त्यावर प्रशासनाकडून बेघर असलेल्या या वंचितांना अद्याप न्याय देण्यात आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही अशी घोषणा केली आहे. मात्र, शासनाच्या योजना राबवण्यासाठी जिल्हय़ातील प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही होत नसल्याने अनेकांचे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. मध्यंतरी प्रशासनाने घरे दिल्याची टिमकी वाजवली असली तरी जिल्हय़ात विविध जातीधर्मातील अनेक कुटुंबे बेघर आहेत.
पारधी समाजाची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. उघडय़ावर हा समाज जीवन जगत असताना प्रस्थापित समाज व शासन व्यवस्था उघडय़ा डोळय़ाने त्यांचे हाल पहात आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी चोर म्हणून हिणवत आहेत. पारध्यांच्या मुलांना शिक्षण नाही, घर नाही, मेल्यास स्मशानभूमी देखील नाही. लाईट, वीज, पाणी या मूलभूत सुविधा तर यांच्यापासून कोसो दूर आहेत. या समाजासाठी योजना असूनही त्या राबवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नम्या भोसले, यंत्र्या भोसले, डिया भोसले, पितांबर भोसले, विजय शिंदे, रोहित शिंदे, खुदा भोसले, अमर भोसले, रोणिका भोसले, मुक्या भोसले, राजा भोसले, रोहित शिंदे, मुक्या भोसले, राजा भोसले, अबदेश भोसले, माकेश भोसले, आकाताई भोसले, तोगरी भोसले व पारधी समाजातील नागरिक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |