05:26pm | Nov 28, 2021 |
कानपूर : कानपूर कसोटीमध्ये हिंदुस्थानचा मधल्या फळीतील खेळाडू श्रेयस अय्यर याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या अय्यर याने पहिल्या डावात 105 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात तो 65 धावा काढून बाद झाला. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासामध्ये पदार्पणात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
तसेच गेल्या 50 वर्षांत पदार्पणाच्या कसोटीमध्ये हिंदुस्थानकडून खेळताना दोन्ही डावात 50 धावांचा आकडा पार करणाराही तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पदार्पणाच्या लढतीत दोन्ही डावात अर्धशतक ठोकले होते. गावस्कर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला पदार्पणाचा कसोटी सामना खेळला होता. यात त्यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात 67 धावांची खेळी केली होती. हा इतिहासाची पुनरावृत्ती श्रेयस अय्यर याने केली असून एक पाऊल पुढे जात पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले.
पदार्पणात सर्वाधिक धावा चोपणारा तिसरा खेळाडू
श्रेयस अय्यर याने पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावात मिळून 170 धावा केल्या. यासह त्याने लाला अमरनाथ यांचा विक्म मोडला. लाला अमरनाथ यांनी पदार्पणाच्या कसोटीत 156 धावा केल्या होत्या. तसेच हिंदुस्थानकडून पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा चोपणाऱ्यांच्या यादीत अय्यरने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यात पहिल्या स्थानावर 187 धावांसह शिखर धवन आणि दुसऱ्या स्थानावर 177 धावांसह रोहित शर्मा आहे.
जगातील 16 वा खेळाडू
पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा अय्यर 16 वा खेळाडू आहे. याआधी केएस रणजीतसिंहजी, जॉर्ज गन, हरबर्ट कोलिंस, पॉल गिब्स, लॉरेन्स रोव, रोडने रेडमंड, गॉर्डन ग्रीनिज, अजहर महमूद, लू विसेंट, स्कॉट स्टॅरिस, यासिर हमीद, एंड्रयू स्ट्रॉस, एलिस्टर कुक, उमर अकमल आणि फाफ डुप्लेसीस यांनीही अशी कामगिरी केली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |