01:16pm | Sep 29, 2020 |
कॅलिफोर्निया : कोरोना महामारीने संपूर्ण जगच हैराण झाले आहे. आता या महामारीचे संकट शार्क माश्यांवरही आले आहे. जवळपास पाच लाख शार्क मासे या महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत मारले ंजाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील शार्क अलाइज या संस्थेकडून हा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाला अटकाव करणार्या अनेक लशींमध्ये शार्कच्या यकृताच्या तेलाचाही समावेश असल्याचा उल्लेख आहे. लशीची परिणामकता वाढवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. शार्कच्या यकृतात एक पदार्थ आढळतो. हे एकप्रकारचे नैसर्गिक तेल आहे. याचा वापर लशीत होतो. जगभरात जवळपास 30 लशीची मानवी चाचणी सुरू आहे. ‘शार्क अलाइज’च्या संस्थापक स्टेफनी बेन्डिल यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टींसाठी प्राणी, माशांना मोठ्या प्रमाणावर मारणे योग्य नाही. विशेषत: ज्या जीवांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यांना ठार करणे चुकीचे आहे. लस विकसित होण्याची प्रक्रिया धीम्या गतीने व्हावे असे मुळीच नाही.
जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊन व इतर माध्यमातून नियंत्रण मिळवले जात असताना लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या लसीमुळे मात्र शार्क माशांचे प्राण धोक्यात आले आहे. जगभरातील पाच लाख शार्क माशांचा बळी जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |