04:40pm | Oct 19, 2020 |
अबुधाबी: आयपीएलच्या 13 व्या हंगामात आज होणारा सामना रंगतदार होणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल त्यांचे आयपीएलमधील आव्हान कायमचे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर होणार्या सामन्याकडे दोन्ही संघाच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आजचा सामना हायहोल्टेज होणार असल्याचे समजले जात आहे.
राजस्थानसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, सलामीची जोडी होय. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा यांनी सुरुवात चांगली करून दिली आहे. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने देखील अर्धशतक झळकावले. फलंदाजीत हा संघ मोठी धावसंख्या उभी करू शकतो. पण विजय मिळवण्यासाठी संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स यांनी अधिक धावा करण्याची गरज आहे. जोस बटलर उत्तम फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. त्याच बरोबर राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चर देखील मोठे शॉट्स खेळतात.
गोलंदाजीत जोफ्रा आणि कार्तिक त्यागी प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतात. तेवतिया आणि श्रेयस गोपाल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. जयदेव उनाडकटने गेल्या सामन्यात खराब गोलंदाजी केली त्याला संघात स्थान मिळते का हे पाहावे लागले.
चेन्नईचा विचार करायचा झाल्यास फलंदाजांची कामगिरी सातत्यापूर्ण नाही. गेल्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये सॅम करन बाद झाला. त्यानंतर शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी मोर्चा सांभाळला. अखेरच्या षटकात रविंद्र जडेजाने तुफानी खेळी केली. धोनीचा फॉर्म हा अद्याप चिंतेचा विषय आहे. तो अद्याप फलंदाजीत कमाल करू शकला नाही. आता राजस्थानविरुद्ध चेन्नईचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहावे लागले. गोलंदाजीत सॅम करन यशस्वी ठरतोय. दिल्लीविरुद्ध 19व्या षटकात त्याने चेन्नईसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. पण ड्वेन ब्राव्हो जखमी झाल्याने जडेजाला अखेरची ओव्हर टाकावी लागली.
कोच फ्लेमिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्राव्हो काही दिवस सामने खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी जोश हेडलवुडला संधी दिली जाऊ शकते. दिपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी जवळ जवळ प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. कर्ण शर्मा अद्याप प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे आज कदाचीत पियुष चावलाला संधी दिली जाऊ शकते.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |