पुसेगाव: भुरकवडी (ता.खटाव) येथील रहिवासी असलेले साई तेजस ट्रेडर्सचे मालक, माजी सैनिक शिवाजीराव हरिबा कदम (वय 75 वर्षे) यांचे दि. 24 एप्रिलला निधन झाले. त्यांच्या पत्नी गोदाबाई शिवाजीराव कदम (वय 70 वर्षे) यांचे दि.30 एप्रिलला सहा दिवसाच्या फरकाने शारीरिक आजार व कोरोना महामारीने सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
(कै.) शिवाजीराव कदम यांनी भारतीय सैन्यदलात 32 वर्ष सेवा बजावून पुणे येथील टेल्कोमध्ये 10 वर्ष काम केले. नंतर गावी येऊन शेतीबरोबर साईतेजस ट्रेडर्स दुकान चालू केले. दरम्यान पतीच्या निधनाची बातमी पत्नी गोदाबाई कदम यांना लागताच त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांची तपासणी केली असता त्याही कोरोना बाधित निघाल्या होत्या. इतर आजार असल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुक्रवार दि.30 रोजी अखेरचा श्वास घेतला. पती - पत्नीच्या अचानक जाण्याने कदम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साई तेजस ट्रेडर्सचे संचालक नानासाहेब कदम, तेजस कदम यांचे आई - वडील तर सोसायटीचे माजी अध्यक्ष मधुकर कदम यांचे भाव -भावजय होत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |