06:05pm | May 13, 2021 |
श्रीकांत जाधव
उंब्रज : उंब्रज, ता.कराड अंधारवाडी गावचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवस्थानच्या रस्त्याचे काम हे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते. तसेच उंब्रज सह आजूबाजूच्या गावातील लोकांचे हे श्रध्दास्थान असल्याकारणाने भाविकांची ये-जा ही याठिकाणी सुरू असते. परंतु कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हे मंदिर बंद ठेवले आहे. तरीही मानकरी आणि पुजारी यांच्याकडून विधिवत पूजा होत आहे. बऱ्याच वर्षापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या परिसरातील भाविकांची होती. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे असते. तसेच गावातील लोकांच्या शेत वस्त्या देखील मंदिर परिसराच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे एकंदरीत रहदारीचा मार्ग हा पिढ्यानपिढ्या वाटेच्या प्रतीक्षेत होता. जणू याच बाबीला दुजोरा देत गावचे सरपंच धोंडीराम बर्गे, उपसरपंच प्रकाश शेजवळ यांच्या पाठपुराव्याने बऱ्याच वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम हे सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील आणि सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निधीतून संकपाळ वस्तीपर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.
तरी मंदिरापर्यंत शेत शिवाराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने ताबडतोब लोकसहभागातून अंधारवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांनी एकत्र येऊन आर्थिक स्वरूपात वर्गणी काढून राहिलेल्या रस्त्याचे मुरुमीकरण करून दुतर्फा नाले काढून रस्त्याचे काम हे पूर्ण केले आहे. त्यामुळे भाविकांसह येथील बर्गे वस्ती, संकपाळ वस्ती, पवार वस्ती मधील लोकांची पावसाळ्यात शेत-शिवारातून ये-जा करताना होणारी तारेवरची कसरत आता होणार नाही. रस्त्याच्या या कामाला सहकार्य केलेल्या नागरिकांचे गावचे सरपंच धोंडीराम बर्गे यांनी आभार मानले आहेत. तसेच गावच्या विकासासाठी असेच एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |