पुसेगाव: अपंग, गतीमंद हे समाजातील कमकुवत घटक आहेत. या दिव्यांग घटकांना मदत करण्यासाठी सक्षम घटकांनी मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी बीसी- ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केले.
वळसे (ता.सातारा) येथील एहसास मतिमंद मुलांच्या शाळेला रमेश उबाळे तसेच ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केळी, सफरचंद आदी फळांचे वाटप केले त्यावेळी ते बोलत होते.
रमेश उबाळे पुढे म्हणाले, गतीमंद, अपंग हे समजातील कमकुवत घटक आहेत. या दिव्यांगांना इतरांप्रमाणे जगणे शक्य होत नाही. अशा मुलांना आई-वडील, नातेवाईकांनाही सांभाळणे शक्य होत नाही. म्हणून शासन, समाजसेवकांनी पुढे येऊन शाळा उभारल्या आहेत. समाजातील सक्षम घटकांनी यासाठी मदत करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात अंध, अपंगांच्या शाळा अडचणीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
दरवर्षी मी नवीन वर्षाचा प्रारंभ एहसास गतीमंद शाळेत खाऊ, फळे वाटप करून करतो. समाजातील दुर्बल घटकांना मदत करताना मला विशेष आनंद होतो. ज्यांना शक्य आहे, त्यांनी व्यसन करून नववर्षाची सुरुवात करण्यापेक्षा दिव्यांगांना मदतीचा हात देऊन करावे. असे मला वाटते. असे सांगून रमेश उबाळे पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात अंध, अपंगांच्या शाळांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे आले पाहिजे. यावेळी ल्हासुर्णे (ता.कोरेगाव) येथील माजी सरपंच नामदेव चव्हाण, अनिल चव्हाण गुरुजी, सुरेश चव्हाण, बाबुराव चव्हाण आदी उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |