12:49pm | Oct 27, 2020 |
अजित जगताप
सातारा: खटाव तालुक्यामध्ये शासकीय पातळीवर लिलाव झाला नसतानाही वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननामुळे नदी व ओढे-नालेपात्र व नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत खटावचे नूतन तहसीलदार किरण जमदाडे यांनी आदेश देताच आज सायंकाळी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणार्या दोन वाहनांवर मुरुमासह पकडून कारवाई केली.
याबाबत महसूल विभागाने माहिती दिली की, औंधनजिक कारंडवडी येथे गट 16/2 मधून अवैधरित्या मुरूम उत्खनन करत असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले. या हद्दीतील गट 23/15 मध्ये कल्याणसिंह राजपूत यांच्या हद्दीत हे मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. जे.सी.बी. वाहन क्रमांक एम एच 11 सी डब्लू 2748 व ट्रॅक्टर एम एच 11 सी ए 9014 या दोन वाहनातून मुरूमाची उत्खनन व वाहतूक केली जात होती.
या वाहनांचे मालक सिद्धेश जगन्नाथ येवले व वैभव भाऊसाहेब घाडगे (दोघे रा.कळंबी) व सहभागी व्यक्ती विजय सुखदेव कारंडे (रा.कारंडेवडी) यांची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान अवैधरित्या मुरुम काढून त्याची वाहतूक होत असल्याची खात्री पटली. सदरची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई औंधचे मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, तलाठी निनाद जाधव यांनी तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली केली. एकूण 40 ब्रास अवैधरित्या मुरूम उत्खनन झाले असून कारवाई करण्यात आली.
खटावचे नूतन तहसिलदार किरण जमदाडे यांनी पदभार घेतल्यानंतर अंबवडे नदीनजिक अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या पुलाखालून वाळू उत्खनन होत असल्याची समजले. त्यानंतर तहसिलदार जमदाडे यांनी संपूर्ण खटाव तालुक्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आज झालेली कारवाईची माहिती तालुक्यात समजताच काही वाळू माफिया तसेच अवैध गौण खनिज उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. दसर्याला आपट्याची पाने (सोने) लुटण्याऐवजी वाळू आणि अवैधी गौण खनिज उत्खनन लूटणार्यासाठी तहसिलदार हे आता कर्दनकाळ ठरणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पंधरा दिवस खटाव तालुक्याला तहसीलदारपदाची प्रतीक्षा होती. किरण जमदाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खटाव तालुक्यातील कोरोना संसर्ग आढावा दिला. त्यानंतर अनेकांच्या त्यांची भेटी घेतली. तरुण, तडफदार अधिकारी मिळाल्याने खटावकरांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच मुसांडवाडी येथे अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपरही आजच महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे. सदरची वाहने पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करून ठेवण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |