03:11pm | Jun 03, 2022 |
बांगलादेश : क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा कसोटी संघाचे कर्णधारपद शाकिब अल हसन यांच्याकडे सोपवले आहे. ३१ मे रोजी कर्णधारपदाचा राजीनामा देणाऱ्या मोमिनुल हकच्या जागी शाकीब अल हसनेची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कारण ३१ मे रोजी बांगलादेशचा माजी कर्णधार हकने राजीनामा दिला होता. शाकीबने आता कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यतिरिक्त बोर्डाने लिटन दासला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवलं आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हक यांनी सांगितलं की, माझी शाकीबसोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे तो खेळण्यासाठी आणि क्रिकेटची संपूर्ण धुरा सांभाळण्यासाठी तयार आहे. वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर बांगलादेश झिम्बाब्वेसोबत खेळण्यास मैदानात उतरणार आहे. परंतु शाकिब या मालिकांमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. तसेच शाकिब किती दिवसांपर्यंत बांगलादेशचा कर्णधार राहणार आहे, हे सुद्धा अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये.
नजमुल यांनी पुढे सांगितलं की, माझ्याजवळ तीन नावं होती. ज्या लोकांनी कर्णधारची निवड केली त्यांनी एक बैठक घेतली आणि मला तीन नावे दिली. त्यामध्ये एकाची कर्णधार आणि दुसऱ्याची उपकर्णधार म्हणून निवड करायची होती. शाकिबने कर्णधारपद नाकारले असते तर आम्ही इतर दोन खेळाडूंचा विचार केला असता. आम्हाला नवीन कर्णधार आणि उपकर्णधार दोघांची नियुक्ती करायची होती. त्यामुळे सुरूवातीच्या चर्चेनंतर आम्ही शाकिब अल हसनला कर्णधार आणि लिटन दासला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
२००९ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात ३५ वर्षीय शाकिबने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर २०१० मध्ये आणखी सहा सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. ऑगस्ट २०११ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये मुशफिकुर रहीमच्या जागी शाकिबने पुन्हा एकदा बांगलादेशचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते. पण २०१९ मध्ये फिक्सिंग प्रकरणात बंदी आल्याने त्याला कर्णधारपद गमवावे लागले होते. शाकिबने एकूण १४ कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर ११ सामने गमावले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |