07:59pm | Sep 14, 2021 |
सातारा : पाच दिवसाच्या घरगुती गणपतीचे साताऱ्यात आज मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत कृत्रिम तळ्यामध्ये विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शहर परिसरात असणाऱ्या उपनगरातील नागरिकांनी संगममाहुली, ता. सातारा येथील कृष्णानदी परिसरात सामाजिक अंतर पाळत गणरायाचे विसर्जन करण्यासाठी उपस्थिती लावली. दुसरीकडे गेले तीन दिवस भक्तिभावाने प्रतिस्थापना केलेल्या गौराईना महिलांनी आज भावपूर्ण निरोप दिला.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर पाच दिवसापूर्वी साताऱ्यात घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना अत्यंत साधेपणाने करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गणपतींची प्रतिष्ठापना करत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सातारा नगरपालिकेने शहर परिसरात बुधवार नाका, राजवाडा येथील भवानी तलाव दगडी शाळा आयुर्वेदिक गार्डन आणि हुतात्मा उद्यान येथे उभारलेल्या कृत्रिम तळ्यावर भक्तांनी गर्दी केली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करत अत्यंत भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला.
उपनगरात असणाऱ्या कृष्णानगर, संगमनगर, संभाजीनगर, विलासपूर, धनगरवाडी, कोडोली, गोडोली, औद्योगिक वसाहत, पिरवाडी, गोरखपुर परिसरातील नागरिकांनी संगममाहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदीमध्ये सामाजिक अंतर पाळत घरगुती गणरायाचे विसर्जन केले. दुचाकी, चारचाकी, रिक्षा या वाहनांमधून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भक्तगण संगममाहुली येथे दाखल होत होते.
दरम्यान, सातारा शहर व परिसरात तीन दिवसापूर्वी घराघरात प्रतिष्ठापना केलेल्या गौराईना आज महिलांनी भावपूर्ण निरोप दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |