नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी डावखुरा फलंदाज सुरैश रैना हे किती चांगले मित्र आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. शिवाय, हे दोघे आधीपासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) सर्वात महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता रैनाने धोनीविषयी एक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे या दोंघाच्या मैत्रीतील गोडवा किती जबरदस्त आहे, हे समोर आले आहे.
रैनाने खुलासा केला आहे, की जर पुढील वर्षी धोनी आयपीएल स्पर्धेचा भाग नसेल, तर तोसुद्धा या लीगमध्ये खेळणार नाही. धोनी आणि रैना हे सीएसके फ्रेंचायझीचे दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत. आयपीएल २००८पासून हे दोघे चेन्नईस्थित फ्रेंचायझीसाठी एकत्र खेळले आहेत. धोनीने बुधवारी आपला ४०वा वाढदिवस साजरा केला आणि असा विश्वास आहे, की यंदाचा आयपीएल त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो.
न्यूज २४ स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, ”जर धोनी आगामी आयपीएल हंगामाचा भाग नसेल, तर मलाही आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची इच्छा नाही. आम्ही २००८ पासून एकत्र खेळलो आहोत. आणि जर आम्ही यंदा आयपीएल जिंकू शकलो, तर मी पुढच्या हंगामात खेळण्यासाठी त्याला विनंती करेन.”
पुढील वर्षी या स्पर्धेत दोन नवीन संघांची भर पडणार आहे, पण रैनाला सीएसकेकडून खेळणे सुरू ठेवायचे आहे. तो म्हणाला, ”पुढच्या सत्रात दोन नवीन संघ येत आहेत, पण मला सीएसकेकडून खेळायचे आहे. मला आशा आहे, की या स्पर्धेत चांगली कामगिरी होईल, मग काय होते ते पाहू.”
सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्या काही क्षणानंतर रैनाने निवृत्तीची घोषणा केली.
धोनी गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याने ३५० एकदिवसीय, ९० कसोटी आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १७,०००हून अधिक धावा केल्या. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील ३३२ सामन्यात भारताचे नेतृत्व केले. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी (टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |