08:24pm | Aug 13, 2022 |
सातारा : सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला देशभक्ती आणि देशसेवेची जाज्वल्य परंपरा आहे. जिल्ह्यातील केंद्रीय, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथे केंद्रीय विद्यालय तातडीने उभारले जावे याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय उभे रहावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.
खा. उदयनराजे यांनी प्रधान यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन सादर केले. या प्रस्तावाची माहिती जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यातील सैनिक कुटुंबांचा विचार करता केंद्रीय विद्यालय निर्मिती होण्याकरता आमचा तातडीचा आग्रह आहे. जिल्ह्याला सैनिकी परंपरा असल्यामुळे केंद्रीय विद्यालयाची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे नोकरीत बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच सशस्त्र दल जवान, केंद्रीय कर्मचारी, शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या आंतरजिल्हा बदल्या यामुळे पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ नयेत याकरिता केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत येथे केंद्रीय विद्यालय उभारले जावे. याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे.
सातारा येथे केंद्रीय विद्यालय अत्यावश्यक असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या विद्यालयाला सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या जून 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यालयाची सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आवश्यक स्टाफिंग पॅटर्न मंजूर करण्याकरताही केंद्रीय संघटन प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे., केंद्रीय विद्यालय उभारणीबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |