पुसेगाव : वृक्षारोपन व वनसंवर्धनाच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसराचा निसर्गसंपन्न कायापालट झाला आहे. वर्धनगडमध्ये अनेक विकास कामे झाली असून भविष्यकाळामध्ये किल्ले वर्धनगड याठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा मानस आहे. गेले दहा वर्षे झाले एक व्हिजन घेऊन वर्धनगट ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये काम करत आहे, असे प्रतिपादन सरपंच अर्जुन मोहिते यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धनगड ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्यावतीने वर्धनगड येथे वृक्ष लागवड व नागरिकांशी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी अर्जुन मोहिते बोलत होते. यावेळी उप वनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, वनक्षेत्रपाल सौ. शितल फुंदे, उपसरपंच शंकर चव्हाण, वनपाल दिलीप वनमाने (पुसेगाव), वनपाल रामदास घावटे (वडूज), पुसेगावच्या प्रियंका माने, डिस्कळचे वनरक्षक राजू काशीद, विसापूरचे वनरक्षक संभाजी दहिफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्जुन मोहिते म्हणाले, वृक्ष लागवड व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांचा मोठा फायदा होतो. वर्धनगड या ऐतिहासिक ठिकाणाला वृक्ष लागवडीमुळे अधिकाधिक निसर्गसंपन्न करता येईल. वर्धनगड परिसरात विविध विकास कामांबरोबरच येथील हुतात्मा स्मारक परिसरात नक्षत्र वन, ऑक्सिजन उद्यान उभारण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत. गावच्या वृक्ष लागवड चळवळीला वनविभागाचे कायम सहकार्य राहीले आहे त्यामुळे आगामी काळात किल्ले वर्धनगड परिसरात चांगली वनराई फुललेली दिसेल. असेही जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा सरपंच अर्जुन मोहिते म्हणाले
यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य रियाजभाई शिकलगार, शंकर घोरपडे, सौ. मदने, गफूरभाई शिकलगार, हुसेनभाई शिकलगार, डॉ. प्रदीप देशमुख, दादा घोरपडे, भरत मोहिते, शिवाजी कदम, विठ्ठल सावंत, संजय घोरपडे, संतोष कुंभार, अर्जुन कुंभार, नसीम शिकलगार, वन कर्मचारी दिलीप जाधव, बबन जाधव, रघुनाथ कदम, संजय बनसोडे, ग्रामसेविका ढेंबरे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. घावटे यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |