सातारा : सातारा जिल्हा बँकेसाठी सोमवारी कच्ची मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच केंद्र सरकारने लागू केलेल्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्टची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील इतर सहकारी बँकांसह सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या स्थगितीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, याबाबत नुकतीच मंत्रालय स्तरावर बैठक पार पडली. याबाबत चर्चाही झाली; परंतु स्थगितीचे कोणतेही आदेश सरकारकडून न आल्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मे 2020 मध्ये सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होणार होती. त्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांचे ठरावही मागवण्यात आले. मात्र, मार्च 2021 मध्ये कोरोनाचे संकट आल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर गत पावणे दोन वर्षांच्या कालावधीत पाचवेळा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या दरम्यान दोन वेळा ही स्थगिती उठवण्यात आली. मात्र, यानंतर अवघ्या काही तासांतच हा निर्णय पुन्हा मागे घेण्यात आला.
राज्यात कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर गत महिन्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर ही निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. आता सोसायट्या व सहकारी संस्थांकडून आलेल्या ठरावांची छानणी करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे हे ठराव पाठवण्यात आले.
त्यांच्याकडून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला यावर हरकती नोंदवण्यात येत आहे. आता सातारा जिल्हा बँकेसाठी 27 हरकती दाखल झाल्या आहेत. दि. 13 रोजी कच्ची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आलेल्या हरकतींवर सुनावणी होणार आहे.
याच दरम्यान पुन्हा एकदा केंद्राच्या बँकींग रेग्युलेशन अॅक्टने खोडा घातल्याने संचालक व सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे केंद्राने लागू केलेल्या कायद्यानुसार जिल्हा बँकांच्या निवडणुका घ्यायच्या का जुन्याच सहकारी कायद्यानुसार घ्यायच्या हा पेच सरकारसमोर पडला होता.
यासाठी खुद्द खा. शरद पवार यांनी पुढाकार घेतला. यावर अभ्यास करण्यासाठी सरकारने 8 सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल मंत्रालयात झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. यावर चर्चाही झाली. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही.
मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली मात्र कोणत्या कायद्यानुसार निवडणुका घ्यायच्या? निवडणुकांना स्थगिती द्यायची का? याबाबचे कोणतेही आदेश सरकारकडून जिल्हा बँकांना प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आताचीच निवडणुक प्रक्रिया सुरळीत राहण्याची चिन्हे आहेत.
अनेक दिवसांपासून निवडणुक स्थगिती व मुदतवाढीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, सरकारकडूनच कोणतेही आदेश न आल्याने तुर्तास तरी जिल्हा बँकांच्या निवडणुका या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |